---Advertisement---
---Advertisement---
सोयगाव : सोयगाव बस आगारात गुरुवारी (३१ जुलै) रोजी वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर नारायण वाडेकर सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांचा सेवानिवृत्त समारंभ सोयगाव बस आगारातील कर्मचाऱ्यातर्फे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बस आगार प्रमुख मनिष जवळीकर हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून वाहतूक निरीक्षक सतीश अंभोरे होते.
यावेळी बस आगार प्रमुख मनिष जवळीकर यांनी सांगितले की, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर सोयगाव बस आगारात संपूर्ण कार्यकाळ गेला आहे. ते सुपरिचित व्यक्तिमत्त्व असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. सोयगाव बस आगारातील वाहक जयराम सूर्यवंशी,शिक्षक रवींद्र तायडे यांनीही ज्ञानेश्वर वाडेकर यांच्या कार्यकाळाची माहिती सांगितली.
आगारातील वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर नारायण वाडेकर कर्मचाऱ्यांनतर्फे सह पत्नीक व सहकुटुंब यांचा सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनां सजविलेल्या बग्गीमध्ये बसवून मिरवणूक काढून बस डेपो ते सोयगाव स्थानकापर्यंत डीजे मिरवणूकिद्ववारे सह परिवार निरोप देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
सेवानिवृत्त कर्मचारी यांचे स्नेहीजन आणि मोठ्या संख्येने एस.टी. कर्मचाऱ्यांनी यांनी सहकुटुंब उपस्थित राहून सेवानिवृत्त कर्मचारी यांना निरोप देण्यात आला. वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर यांनी सांगितले की, माझे नोकरीचे एकूण २७ वर्ष २ महिने २७ दिवस सोयगाव बस आगारात नोकरी केली.त्याबद्दल मी माझ्या कार्यकाळातील आगार प्रमुख,तसेच सर्व कर्मचारी व सोयगावसह परिसरातील नागरिकांचे मला वेळेवर मोलाचे सहकार्य लाभले त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय कामगार सेना सचिव शिवाजी बोरडे, संतोष पाखरे, जयराम सूर्यवंशी, सहाय्यक वाहतूक नियंत्रण कैलास बागुल, वाहतूक नियंत्रक दिनेश विसपुते, मधुकर शिंदे, विष्णू सोनवणे, रमेश पायघन, अन्नासाहेब ढेपले, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर गोरे, वर्जन जाधव, राजू बाविस्कर, मधुकर आमटे, सुधाकर बोराडे, रमेश साबळे, सुनिल पवार, अशोक तायडे सह सोयगाव शहरातील नगरपंचायतचे गटनेते अक्षय काळे, नगरसेवक राजेंद्र दुत्तोडे, संदीप सुरडकर, संतोष वाडेकर, गलवाडा गावचे पोलीस पाटील मिलिंद सोनवणे, भाग्यवान बनसोडे, सोयगाव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विवेक महाजन, कै.बाबुरावजी काळे पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन योगेश बोखारे, कृष्णा शेवाळकर, पत्रकार, व्यापारी बंधू, मित्र परिवार, बस आगारातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी सतीश पाटील, संतोष पाखरे, अण्णा ढेपले, रमेश साबळे, विनोद जाधव यांनी परिश्रम घेतले. समाधान जाधव यांनी सूत्रसंचालन केले तर सतीश पाटील यांनी आभार मानले.