---Advertisement---

खुशखबर! जळगावातील तरुणांना रोजगाराची संधी, जाणून घ्या शैक्षणिक पात्रता

---Advertisement---

जळगाव : येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत १७३ हून अधिक रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा केली आहे. युवक-युवतींना शासकीय व खाजगी आस्थापना / उद्योजकांकडे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे, तसेच गरजू युवकांना रोजगाराची संधी आणि उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध हा योजनेचा उद्देश आहे.

उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे. यात १२ वी पास: रु. ६,०००/- प्रति महिना, आय.टी.आय. / पदविका: रु. ८,०००/- प्रति महिना व पदवीधर / पदव्युत्तर: रु. १०,०००/- प्रति महिना विद्यावेतन देण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील विविध नामांकित आस्थापनांमध्ये युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. या योजनेचा लाभ घेण्याकरिता उमेदवारांचे वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.

बेबसाईटवर ऑनलाईन अप्लाय करण्याची कार्यप्रध्दती

www.cmykpy.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्या. INTERN LOGIN हा पर्याय निवडून SIGN UP करावे. LOGIN झाल्यावर Apply for job या पर्यायावर क्लिक करावे तसेच, आस्थापनेने टाकलेल्या वरिल पैकी रिक्तपदास Apply करावे व संबंधित आस्थापनेशी संपर्क साधावा.

याबाबत काही अडचणी आल्यास अथवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) सकाळी 09.45 ते सांयकाळी 06.15 वाजेपर्यंत स्थानिक जळगाव कार्यालयाशी 0257-2959790 वर कार्यालयीन वेळेत दूरध्वनीद्वारे किंवा प्रत्यक्ष संपर्क साधावा, असे आवाहन संदीप ज्ञा. गायकवाड सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment