---Advertisement---
भुसावळ :भुसावळ : शहरातील अतिक्रमण हटविण्यासाठी भुसावळ नगरपालिका प्रशासनाने सोमवारी जोरदार मोहीम राबविण्यात आली. यात यावलरोडवरील गांधी पुतळा ते जामनेर रोडवरील नाहाटा महाविद्यालय या मार्गावरील अतिक्रमण काढण्यात आले. सकाळी ९ वाजताच गांधी पुतळ्याजवळ अतिक्रमण हटाव पथकाचा ताफा हजर झाल्याने हातगाड्यांसह रस्त्यावर टपऱ्यांचे अतिक्रमण, रस्त्यावर अडथळा ठरणारे फलक विक्रेत्यांनी स्वतःहून काढून घेतले. यामुळे गांधी पुतळा परिसर, यावलरोड, जामनेररोडवरील शुकशुकाट निर्माण झाला होता.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात येत असल्याने स्थानिक विक्रेत्यांनी नाराजीचे वातावरण आहे. पालिका प्रशासनाने गेल्या शुक्रवारी (दि. ४) मुख्य बाजारपेठेतील ४० हजार स्केअर फुटावरील जागेवर केलेले अतिक्रमण हटवले. यानंतर आता शहरातील सर्व प्रमुख मार्गावरील अतिक्रमण हटवण्यात येणार आहे.
---Advertisement---
या मोहिमेत सोमवारी पालिकेने गांधी पुतळा, महाराणा प्रताप चौक, सतारे लोखंडी बोगदा, छत्रपती शिवाजी महाराज संकुल ते जामनेररोडवरील चौफुलीपर्यंतच्या नाहाटा भागातील अतिक्रमण हटवण्यासाठी मोहिम हाती घेतली. सकाळी ९ वाजता जेसीबी व पथक गांधी पुतळ्याजवळ हजर झाल्यानंतर विक्रेत्यांनी स्वतःच हातगाड्या, टपऱ्या हटवून घेतल्या. पालिका प्रशासनाकडून पावसाळ्यात अतिक्रमण काढले जात असल्याने विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली
अतिक्रमण हटाव मोहिम अजून दोन दिवस सुरु ठेवली जाणार आहे. आज मंगळवारपासून जळगावरोड, खडकारोड व यावलरोडचे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. मात्र पालिकेनेमोहिम जाहिर केल्याने या मार्गावरील टपऱ्या, हातगाड्या, अतिक्रमीत बांधकामे विक्रेत्यांनी काढून घेतली आहेत. पालिकेने मात्र न काढलेल्या अतिक्रमण निरस्त करण्याचा इशारा दिला.