---Advertisement---
---Advertisement---
पाकिस्तानसाठी पाणी एक मोठे संकट बनून ‘आ’ वासून उभे आहे. सध्या तर हा देश पुराच्या हाहाकारात आहे. मात्र, भविष्यातील अतिशय भीषण आहे. ज्या पद्धतीने जलसंकट गडद होत आहे, ते पाहता चित्र आगामी काळात पाकिस्तान पाण्याच्या थेंबासाठीही तडफडणार, असे सांगितले जात आहे.
पाकिस्तानकडे पावसाचे पाणी साठवण्याची कोणतीही यंत्रणा नाही. दुसरीकडे, भारताने सिंधू नदीचे पाणी अडवल्याने त्याच्यासाठी स्थिती आणखीनच बिकट झाली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र ‘डॉन’ नुसार, काही वृत्त असे आले आहेत, ज्यात भविष्यात पाकिस्तानात पाण्याची स्थिती भयंकर होणार, असे म्हटले आहे.
पर्यावरण तज्ज्ञांनी सातत्याने इशारा दिला आहे की, दक्षिण आशियात पूर आणि दुष्काळाचे चक्र सुरूच राहणार आहे. अशा स्थितीत पुरेसा पाणीसाठा नसल्याने पाकिस्तानचा त्रास वाढणार हे निश्चितच मानले जात आहे. वॉटर पॉवर्टी इंडेक्सनुसार, पाकिस्तान जगातील असा १५ वा देश आहे, जिथे पाण्याची टंचाई आहे.
इंटरनॅशनल दुसरीकडे, ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशननुसार, २०३५ पर्यंत पाकिस्तान पाण्यासाठी तडफडणार आहे. वर्ल्ड वाइल्डलाईफ फंड-पाकिस्तानच्या अहवालानुसार, येथे पाण्याचा पातळी सातत्याने कमी होत आहे. १९४७ मध्ये पाकिस्तानकडे ५६०० क्युबिक
मीटर पाण्याचा अंदाज होता. मात्र, २०२३ मध्ये तो घटून ९३० क्युबिक राहिला. संयुक्त राष्ट्राच्या फूड ॲण्ड ॲग्रिकल्चरल ऑर्गनायझेशननेही यासंदर्भात पाकिस्तानला इशारा दिला आहे.
त्यांच्यानुसार, पाकिस्तानमधील पाणीटंचाई जगात सर्वाधिक अशी आहे. ही स्थिती अशी आहे की, आगामी काळात त्यांना जगणेही कठीण होऊन बसणार आहे. भारताने सिंधू पाणी करार रद्द करून पाकिस्तानचे पाणी रोखले आहे. या करारामुळे पाकिस्तानला सिंधू, झेलम आणि चिनाबच्या पाण्याचा अधिकार मिळत होता. त्यातून पाकिस्तानच्या ८० टक्के गरजा भागत होत्या. आता मात्र त्यातही वांधे झाले आहेत.