जळगाव जिल्हा दूध संघ निवडणूक अपडेट

तरुण भारत लाईव्ह  न्युज जळगाव – जिल्हा दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. शनिवारी सकाळी बारा वाजेपर्यंत जिल्हाभरात ७ मतदान केंद्रांवर सरासरी 60.31 टक्के मतदारांनी मतदान केले.

जिल्हा सहकारी दूध संंघाच्या २० संचालकांसाठी निवडणूक प्रकिया सुरू आहे. दूध संघ संचालक मंडळासाठी ३८ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
शनिवारी १८ रोजी जिल्ह्याच्या मुख्यालयी जामनेर आणि जळगाव मतदार संघासाठी मतदान केंद्रांवर महिला राखीव मतदार संघासह जामनेर आणि जळगाव संघातील अनु.जाती, वि.जा.भ.ज, सर्वसाधारण आणि इतर मागासवर्गीय असे ५ गटातील उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी मतदान केंद्रांवर उपस्थित असल्याचे दिसून आले.

मतदान केंद्रावर उमेदवार समर्थकांचीच गर्दी

जळगाव येथील सत्यवल्लभ हॉल मतदान केंद्रावर महिला राखीव संघाच्या उमेदवार जयश्री महाजन, मालतीबाई महाजन, पूनम पाटील, तसेच अरविंद देशमुख, मंत्री गिरीष महाजन, दिनेश पाटील आदि उमेदवारांचे प्रतिनिधींची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून आली.

जिल्ह्यातील सात केंद्रांवर सरासरी मतदान स्थिती अशी अमळनेर 52, भुसावळ 38, चाळीेसगाव 22, एरंडोल 48, फैजपूर 35, जळगाव 42, पाचोरा 29 एकूण 266 मतदारांनी 12 वाजेपर्यंत म्हणजेच सरासरी मतदार संख्येच्या 60.31 टक्के मतदारांनी मतदान नोंदवले आहे.