Equilibrium project : बालकांमधील संस्कार आणि संस्कारातील आदारातिथ्य……

Equilibrium project जळगाव : बालकांमधील संस्कार आणि संस्कारातील आदरातिथ्य काय असते याचा अनुभव समतोल प्रकल्पाच्या सहकाऱ्यांना आला.
7 जानेवारी रविवार रोजी जळगाव रेल्वे स्टेशनबाहेर पाहणी करीत असतांना समतोल प्रकल्पाच्या सहकाऱ्यांना तीन लहान बालके कचरा भंगार गोळा करतांना सापडली. त्यांना पकडताच ती रडू लागली व विचारपूस केल्यावर उडवा- उडवीची उत्तरे देऊ लागली. असे रडारडीचे वातावरण बघून अवतीभवती गर्दी जमा झाली. त्यांनी तात्काळ त्या बालकांना समजावून त्यांना बाल सहाय्यता केंद्रात आणले. सकाळच्या 8 वाजेपासून घरून कचरा वेचण्यासाठी निघाल्यामुळे त्या बालकांना भूक लागलेली होती. तिन्ही बालकांना खाऊ देऊन त्यांना शांत केले. प्रेमाने बोलून करून त्यांना आपलेसे केले. यांचा परिणाम म्हणून हसत हसत त्यांनी सर्व माहिती दिली. ते मुळात जिल्हा भोटाड, गुजरातचे रहिवाशी आहेत, इकडे आम्ही दौलत नगर, जळगाव मध्ये राहतो, असे त्यांनी सांगितले.
समतोलच्या Equilibrium project सहकाऱ्यांनी त्यांना GRP कडे त्या बालकांना नोंदणीसाठी आणि सुरक्षित घर वापसी करण्यासाठी घेऊन गेले. तेथून दौलत नगरातील त्यांच्या घरी गेले. या तिन्ही बालकांचा परिवार देशी तूप विकण्याचे काम करतो. घरची परिस्थिती अत्यंत गरीब. आई वडिलांनी पतंग घेण्यासाठी पैसे दिले नाही म्हणून ते रेल्वे स्टेशनवर पतंग घेण्यासाठी पैसे जमा व्हावे, यासाठी आलेले होते. त्यांना सांगितले की या वर्षी आम्ही तुम्हाला पतंग घेऊन देऊ व मकर संक्रात तुमच्या सोबत साजरी करू, असे बोलताच त्यांचं मन भरून आले.

बालकांतील संस्कार अन्‌‍ चहा
त्या बालकांनी आईला त्यांच्या भाषेत सांगितले की सरांसाठी चहा ठेव, माझ्याकडे भंगार वेचून 150 रू जमा झालेले आहेत“ असे बोलून त्यांना भंगार व कचरा विकून मिळालेल्या पैशातून त्या बालकांनी दूध आणले व आग्रह करीत चहा पाजली. त्या बालाकांच्या व त्याच्या मातेच्या या आदरातिथ्याने समतोलचे सहकारी चांगलेच भारावले. यामुळे त्यांचे मन भरून आले आणि झोपडीत खरी माणुसकी दिसून आली. मुलांना सुखरूप पोहचविल्याबद्दल या परिवाराने संस्था व संस्थेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.