“इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी, चारचाकी लवकरच भारतात

मुंबई :  पायाभूत सुविधांसह रस्त्यांची बांधणी झाल्याने देशात अनेक बदल झाले आहेत. रस्ते बांधणीमुळे अनेक राज्यांमधील पर्यटकांच्या संख्येत झालेल्या वाढीसह विविध सकारात्मक गोष्टी घडू शकल्या आहेत. त्यासोबतच देशात पेट्रोल डिझेलवर धावणाऱ्या गाड्यांना पर्याय म्हणून लवकरच इथेनॉलवर चालणाऱ्या चारचाकी गाड्या बाजारात आणण्याचे काम पूर्णत्वास जात आहे. इथेनॉलवर चालणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्या काही महिन्यात भारतीय बाजारात उतरणार असून त्यामुळे प्रवाशांचा प्रवास खर्च आणि वातावरणात होणारे प्रदूषण कमी होण्यास मोठी मदत होणार आहे,” असा विश्वास गडकरी यांनी व्यक्त केला.

मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले की, ”मुंबईतील प्रदूषण व वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी व वाहतूक गतिमान करण्यात नितीन गडकरी यांचे मोठे योगदान आहे. त्यांनी राज्यात मंत्री असताना मुंबईत ५२ उड्डाणपूल बांधून दाखवले होते. मुंबईतील प्रश्नांची माहिती, तिथे काय उपाययोजना करायच्या याबाबतचे बारकावे गडकरींना चांगल्या प्रकारे माहिती आहेत. मुंबईत उपचारांसाठी रुग्णासोबत येणाऱ्या कर्करोग बाधितांच्या कुटुंबियांना वास्तव्यासाठी जागा नव्हत्या आणि हे गडकरींच्या लक्षात आले. त्यावेळी संवेदनशीलता दाखवून त्यांनी बीपीटीच्या जागेवर ४ इमारती उभारून त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली होती,” अशी आठवण शेलार यांनी यावेळी सांगितली.

तर मुंबई दिल्ली प्रवास बारा तासात

”मी राज्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना मुंबईत बांधलेले पूल आणि मुंबई – पुणे द्रुतगती महामार्ग आज महत्त्वाचे ठरत आहेत. त्याप्रमाणे देशातील अनेक महत्त्वपूर्ण शहरांना परस्परांशी जोडण्यासाठी आम्ही महामार्गांची निर्मिती करत आहोत. त्या धर्तीवर देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडण्यासाठी महामार्गाच्या बांधणीचे काम आम्ही सुरु केले आहे. मुंबईतील नरिमन पॉईंट पासून दिल्लीला जाण्यासाठी महामार्ग बनविण्याचे माझे स्वप्न असून हा मार्ग बनल्यावर मुंबई ते दिल्ली हा प्रवास अवघ्या बारा तासांत पूर्ण करता येईल,” अशी आशा गडकरी यांनी मुंबईत बोलताना व्यक्त केली आहे