एटीएम पिन विसरले तरी आता एटीएम मधून कॅश काढा!

आता युपीआय च्या माध्यमातून एटीएम वापरणे आता सहज शक्य!

मुंबई: एटीएम नसेल तर काय? प्रश्न पडला आहे ना? नेमका असाच अनुभव आपल्याला येतो काही ठिकाणी युपीआय चालत नसल्यास कॅशची गरज लागले अशा वेळी नेमकी आपल्याकडे कॅश नसल्यास काय करावे हा प्रश्न पडतो. याचे उत्तर सोपे आहे. यावर आता पर्याय उपलब्ध आहे. पण त्याआधी त्याची गरज समजून घेणे महत्वाचे आहे. युपीआयमुळे रोख व्यवहारांचे महत्त्व कमी झाले असले तरी काही व्यवहार आजही रोख रकमेवर चालतात.

अशावेळी हातात रोख रक्कम असल्यास प्रश्न सुटतो. पण सवय नसल्यास अनेकदा एटीएम (ATM) पिनकोड विसरण्याची शक्यता असते. आता तो विसरल्यास काय करावे हा प्रश्न पडतो. अशावेळी सोपी क्लुप्त्या उपयोगी पडतात.

त्यामुळे रोख रक्कम नसल्यास कसे पैसै काढाल?

आता तुम्ही युपीआयच्या माध्यमातून एटीएम मशिनमधून पैसे काढू शकतात. कॅशविथड्रॉव्हल सिस्टीम प्रणालीत नवीन अपडेट आली आहे. Interoperable Cardless Cash Withdrawal (ICCW) माध्यमातून तुम्ही एटीएम मधून पैसे काढू शकता. तुमच्या कडे केवळ युपीआय प्रणित पेटीएम, जीपे, भीम, फोनपे सारखी एप्लिकेशन्स स्मार्टफोनवर असणे गरजेचे आहे.

कसे पैसे काढाल?

एटीएम मध्ये जाऊन कॅश विथड्रॉव्हल (Cash Withdrawal) पर्याय निवडा

युपीआय (UPI) पर्याय एटीएमवर स्विकारा.

QR कोड निवडा

फोनवर QR कोड स्विकारून Scan करा

किंमत टाका व प्रोसिड करा

युपीआय पिन टाका