जळगाव : लोकसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी देशपातळीवर 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान पार पडले, यात राजस्थानमध्ये आतापर्यंतच्या मतदानाचा कौल पहाता भाजपा शतप्रतिशत विजयी होणार असल्याचे संकेत आहेत. तर आगामी 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात विशेषतः जळगाव जिल्ह्यातील दोन मतदार संघात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरिक मतदाराने प्रथम मतदान मग जलपान या उक्तीप्रमाणे मतदान अवश्य करा असे आवाहन राजस्थानचे भाजपा प्रभारी खा.विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. ते जीएम फाऊंडेशन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी महानगर जिल्हाध्यक्ष उज्जला बेंडाळे, जळगाव लोकसभा क्षेत्र प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, राजेंद्र नन्नवरे आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. सहस्त्रबुद्धे म्हणाले की, राजस्थानमध्ये आतापर्यंतच्या झालेल्या निवडणूकामध्ये परंपरागत जातीपातीचे आरक्षण वा मतपेटीच्या राजकारणाचा मोह विरोधी पक्षांना आवरता आलेला नाही, यातून जाती-जातीत विव्देषाचे विष कालवण्याचे कार्यच आतापर्यंत विरोधकांनी केले आहे. परंतु , भारतीय जनता पक्ष हा सर्वसामान्य जाट, राजपूत, मीणा आदी समाज बांधवाच्या मागे वेळोवेळी उभा राहिला आहे. आणि गेल्या दहा वर्षात रेल्वे, रस्ते, विकास कामे, दळणवळण, वाहतूक व्यवस्था व सुविधा, कृषी विकास, सिंचन, आदि विकास योजना यात कोणती सुधारणा भाजपाकडून करण्यात आली. या विकास कामांची माहिती देण्याची आवश्यकता नाही. या योजनांचा लाभ सर्वसामान्यांपर्यंत पोचला हा सर्वसामान्य नागरिकांच्या अनुभवाचा विषय आहे.
आमची कामे पाहून मतदान करा, हे मविआचे नेते सांगू शकत नाहीत
महाराष्ट्रात अडीच वर्षातील कामगीरी पाहून आम्हाला मतदान करा, हे नाना पटोले, उद्धव ठाकरे किंवा अन्य महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आम्ही हे काम केले हे सांगू शकत नाहीत. याउलट महायुतीतील भाजपाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. मुख्यमंत्री शिंदे यांनी केलेल्या कामांच्या आधारे विश्वासाने मत मागत आहेत.
मंदिर वही बनायेंगे तारीख नही बतायेंगे असे विरोधकाकडून विचारले जात होते. परंतु मंदिर वहि बनायेंगेचे आश्वासन पूर्ण केले आहे. त्यामुळे विरोधकांना मुद्दे नाहीत म्हणून व्यक्तीगत पातळीवर टिका केली जात आहे.
संविधानाने दिलेली समानता मतपेटीच्या राजकारणामुळे कधीही अंमलात आणू शकले नाहीत विरोधकांना विकासात्मक मुद्दे नसल्याने तसेच 2008 मध्ये झालेल्या मुंबई बॉम्बस्फोटातील अजमल कसाब या प्रकरणाचा कलुषित मताचा आधार घेत भडकविले जात असून काँग्रेसचे नाना पटोले यांनी पोलिसांनी केलेल्या कामगिरीचे कौतुक न करता पोलीसांचेच मनोधैर्य खच्ची केले जात असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.
मराठा समाज आंदोलनाच्या राजकारणाला बळी पडणार नाही
राजस्थानमध्ये मीणा समाजाप्रमाणेच महाराष्ट्रात देखाल मराठा समाज आंदोलनाच्या राजकारणाला बळी पडणार नाही असे मराठा आंदोलन व लोकसभा निवडणूक यावर काही परिणाम होणार नसल्याचेही खा.सहस्त्रबुद्धे यांनी सांगीतले.
केंद्रांच्या योजना शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण
कुसुम, पीएम सन्मान योजना केंद्र व राज्य शासनाकडून तसेच शासन स्तरावरून ट्रॅक्टर, शेतीपयोगी औजारे खरेदी करून औजारे बँक स्थापन करून भाडेतत्वावर शेतीकामासाठी देण्याची योजना अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या उत्थानासाठी केली जात आहे.
देशपातळीच्य निवडणूकीत स्थानिक मुद्दे
लोकसभेची निवडणूक कि देशाची निवडणूक असून राज्य वा स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक नाही. तरीदेखील या निवडणूकीत स्थानिक प्रश्न उपस्थित करीत सर्वसामान्या मतदारांचे लक्ष विचलीत व्हावे, यासाठी विरोधकांकडून आरोप प्रत्यारोप करीत मतदारांची दिशाभूल करण्याचेच प्रयत्न केले जात असल्याचेही खा.सहस्त्रबुद्धे यांनी सांगीतले.