धावत्या रेल्वेसमोर ‘तो’ अचानक आल्याने फलाटावरील सर्वांचा चुकला काळजाचा ठोका ; प्रशासनाची उडाली तारांबळ

जळगाव : मध्य रेल्वेच्या मालगाडीसमोर अचानक एक व्यक्ती आल्याने जळगाव रेल्वे स्थानकावरील कार्यरत कर्मचाऱ्यांसह फलाटावर उभ्या असलेल्या प्रवाशांचा क्षणभर काळजाचा ठोका चुकला. क्षणात कर्मचाऱ्यांसह आरपीएफ जवानांची त्या व्यक्तीला शोधण्यासाठी धावपळ सुरू झाली. आणि अचानक दुसऱ्या दुसऱ्या फलाटावर नुकत्याच सुरू झालेल्या मालगाडीच्या शेवटच्या भागात बसून ती व्यक्ती जात असल्याचे पाहून अनेकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

पुन्हा ती मालगाडी थांबवण्यासह त्या अनोळखी व्यक्तीला उतरविण्यासाठी आरपीएफ जवानांना धावपळ करावी लागली. मध्य रेल्वेच्या जळगाव जंक्शन स्थानकावर दररोज शेकडो प्रवासी मेल एक्सप्रेस तसेच मालगाड्या ये-जा करतात. मेल एक्सप्रेसने सुमारे हजारो प्रवासी उतरचढ तसेच ७.३० नंतर ११ वाजेपर्यंत एकही प्रवासी गाडीला थांबा नाही. त्यामुळे सकाळच्या वेळी मोठ्या प्रमाणावर नोकरदार, शाळा-महाविद्यालयीन कामगार कर्मचाऱ्यांची गर्दी असते. परंतु रविवार असल्याने नियमित प्रवाशांची गर्दी अत्यंत तुरळक होती.

रविवार सकाळी साडेआठ नउ वाजेच्या सुमारास दोन नंबर फलाटावर मनमाडकडे जाणारी रिकाम्या डिझेल टँकरची वॅगन उभी होती. त्याचवेळेस ३ नंबर फलाटा जवळ लोहमार्गावर अचानक एक व्यक्ती येवून उभा असताना समोरून भुसावळच्या दिशेने जाणारी मालगाडी सर्वसाधारण वेगाने जात होती. या मालगाडीच्या समोर अचानक एक व्यक्ती येवून उभा राहिल्याने लोकोपायलटने हॉर्न वाजविला. त्याचवेळी चाणाक्ष व सावध असलेल्या लोकोपायलटने तातडीने गाडी थांबवली. आणि त्या व्यक्तीचा जीव वाचला.

फलाटावर असलेल्या कर्मचाऱ्यांना लोहमार्गावर त्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी गाडी थांबवली. परंतु, समोरून नुकत्याच वेग पकडत असलेल्या डिझेल वॅगनच्या एका कोपऱ्यावर ती व्यक्ती दिसून आल्याने त्याला उतरविण्यासाठी आरपीएफसह अन्य कर्मचाऱ्यांनी फलाटाच्या शेवटच्या टोकाला धाव घेतली. दोन नंबर फलाटावरील मालगाडी थांबवून त्या व्यक्तीला उतरवून घेत आरपीएफ पोलीसांनी ताब्यात घेतले.