केंद्र सरकार, मंत्रिमंडळाने मोफत रेशन योजनेला एक वर्षासाठी मुदतवाढ दिली आहे. यासोबत वन रँक वन पेन्शनमध्ये सुधारणा करण्यात आली आहे.
यापूर्वी 20600 पेन्शनधारकांना लाभ मिळत होता. आता सुधारणा केल्यानंतर 25 लाख पेन्शनधारक झाले आहेत. त्यामुळे 8500 कोटींचा बोजा पडणार आहे.
यापूर्वी सप्टेंबरमध्ये सरकारने पीएमजीकेवायची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत तीन महिन्यांनी वाढवली होती. कोरोनाव्हायरसचा प्रसार रोखण्याच्या उद्देशाने देशव्यापी लॉकडाऊनमुळे गरिबांना खाण्यासाठी मदत म्हणून एप्रिल 2020 मध्ये PMGKAY लाँच करण्यात आली.
या योजनेअंतर्गत 80 कोटी गरीब लोकांना दरमहा पाच किलो गहू आणि तांदूळ मोफत दिले जातात होते.