मतदारांसाठी आठवडी बाजारात सुविधा कक्ष

जळगाव : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आठवडे बाजार असलेल्या प्रत्येक गावी ‘मतदार सुविधा कक्ष’ स्थापन करण्यात येत आहे.

जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सूचनेनुसार बाजाराच्या दिवशी हे मतदार सुविधा केंद्र उभारून मतदारांना मतदान विषयीक सर्व माहिती दिली जाणार आहे. यात मतदानापूर्वी आपली मतदार यादीत नाव कसे बघायचे, स्लिप कशी काढायची,पुराव्यासाठी 12 पैकी कोणतेही एक असेल तर ते गृहीत धरले जाते. याबाबतही त्यांना अवगत करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. असे सुविधा केंद्र 8 मे पर्यंत उभारले जाणार आहेत. मतदान सुविधा केंद्र उभारून जनजागृती बाबतचे आदेश सुरु केल्यानंतर पारोळा, जळगाव, चोपडा येथील रविवार आठवडे बाजारात सुविधा केंद्र उभारून मतदारांना सविस्तर माहिती देण्यात आली.