Thackeray-Fadnavis-Nagpur देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत आले. नंतर बरेच काही घडतं-बिघडतंय. राजकारण तर बदलले आहेच; पण नवनवी समीकरणंही पुढे येत आहेत. नवनव्या भेटीगाठी पडताहेत. काकाचा पक्ष फोडल्यानंतर तिकडे अजिबात न फिरकलेले अजित पवार त्यांच्या दर्शनाला सहकुटुंब जाऊन आले. त्यातून काका-पुतण्या एकत्र येणार अशी चर्चा सुरू झाली. निवडणुकीच्या रणधुमाळीत ‘तू राहशील नाहीतर मी राहीन’ अशा भाषेत ललकारणाऱ्या उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला नागपूरला यावं लागलं. Thackeray-Fadnavis-Nagpur तिकडे दिल्लीत शरद पवार पंतप्रधान नरेंद्र माेदींना भेटले. साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यासाठी ही भेट हाेती, असे सांगितले गेले. पण साहित्यापलीकडे काही झाले नसेल असा दावा करता येणार नाही. मंत्रिमंडळ विस्तारानंतर तर अनेकांनी नाराजीचे झेंडे फडकावले. राष्ट्रवादीच्या अजितदादा पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या बंडाची सर्वाधिक चर्चा आहे. पहिल्या दिवशी अधिवेशनाला दांडी मारून भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी थाेडी हवा गरम केली हाेती.
Thackeray-Fadnavis-Nagpur मात्र ‘आपण नाराज नाही’ हे त्यांना लगेच सांगावे लागले. मंत्रिमंडळातून वगळले म्हणून छगन भुजबळ, तानाजी सावंत गावाला निघून जातात. मात्र, भाजपाचे थाेडेथाेडके नव्हे, तर तब्बल 132 आमदार शिस्तीत राहतात. फडणवीस यांची आपल्या पक्षावर आणि एकूणच महायुतीवर किती पकड आहे, याचा हा नमुना आहे. सहसा घराबाहेर न पडणारे ‘शिल्लक शिवसेने’चे सुप्रीमाे उद्धव ठाकरे मुंबई साेडून नागपूरला आले. विधानभवनात त्यांनी घेतलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट अनेकांना चकित करून गेली. फडणवीसांना ‘टरबूज’, ‘कलंक’, फडतूस’ काय काय नाही बाेलले. Thackeray-Fadnavis-Nagpur तब्बल पाच वर्षे गाेटमार करणारे उद्धव ठाकरे चक्क फुलं घेऊन आले तेव्हा फडणवीस यांनी स्वतःला चिमटा काढला असणार. आता ते आले म्हणजे लगेच घरवापसी हाेईल असे नाही. पण हे कट्टर राजकीय वैरी एकमेकांना भेटू शकतात ही घटना भविष्यातल्या संभाव्य उलथापालथीची नांदी असू शकते. उद्धव साधुसंत नाहीत. पक्के धूर्त राजकारणी आहेत. एकनाथ शिंदे अडीच वर्षांपूर्वी शिवसेना फोडून मुख्यमंत्री झाले हाेते. शिंदेंची तेव्हा मुख्यमंत्री म्हणून सदिच्छा भेट घ्यावी, असे उद्धव यांना वाटले नाही. आता त्यांना महाराष्ट्राची संस्कृती आठवली. गरज म्हणून ते धावले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनाही भेटले.
Thackeray-Fadnavis-Nagpur विधानसभेतले विराेधी पक्षनेतेपद त्यांच्या पक्षाला हवे आहे. अर्थात याचा निर्णय नार्वेकर यांना करायचा आहे. या निमित्ताने का हाेईना, उद्धव झुकले, हेही नसे थाेडके. पाच वर्षांपूर्वी माेठ्या आशेने उद्धव शरद पवारांकडे गेले. अडीच वर्षांचे मुख्यमंत्रिपद साेडले तर त्यांच्या हाती काही लागले नाही. पक्ष गेला, निवडणूक चिन्ह गेले, 40 आमदार साेडून गेले. एका ‘हिरव्या रंगाने’ घात केला. आता त्यांच्याकडे देण्यासाठी काही नाही. महाविकास आघाडीची पुंगीही माेडल्यात जमा आहे. मनसेने मतं खाल्ली म्हणून 20 जागा तरी मिळाल्या. अन्यथा एका आकड्यात उद्धव सेना संपली असती. हे 20 आमदारही किती काळ उद्धवकडे टिकतात ते पाहायचे. Thackeray-Fadnavis-Nagpur आता पुढची पाच वर्षे माेठ्या निवडणुका नाहीत. सत्तेशिवाय हे आमदार टिकतील? चार-सहा महिन्यांनी महापालिकेच्या निवडणुका आहेत. यावेळी मुंबई महापालिका हातची गेली तर उद्धव संपले. कडवे हिंदुत्वच आपल्याला वाचवू शकते, हे लक्षात आल्याने उद्धव यांचा सूर बदलला आहे. फडणवीस आता त्यांना ‘सफरचंद’ वाटायला लागले आहेत. दादरमधल्या हनुमान मंदिरात आरतीसाठी आदित्य ठाकरे धावले ते त्यापाेटीच; पण खूप उशीर झाला.
Thackeray-Fadnavis-Nagpur 2029 च्या निवडणुकीत ‘शत-प्रतिशत भाजपा’ हे माेदी-शाह यांचे टार्गेट आहे. भाजपाला तशीही आता गरज नाही. प्रचंड बहुमत आहे महायुतीकडे. ठाकरेंना जवळ घेतले तर एकनाथ शिंदे यांचे आमदार बिथरतील. त्यामुळे फडणवीस नवी डाेकेदुखी विकत घेणार नाहीत. फडणवीसांना चक्रव्यूहात अडकवू पाहणारे महाविकास आघाडीचे नेते आज स्वतःच चक्रव्यूहात सापडले आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार हे कुठल्याही मुख्यमंत्र्याला आव्हान असते. यावेळी तर अभूतपूर्व परिस्थिती हाेती. सत्ता बाकांवर महायुतीचे 200 पेक्षा जास्त आमदार आहेत.Thackeray-Fadnavis-Nagpur एकट्या भाजपाचेच 132 आमदार निवडून आले आहेत. मंत्रिपदं आहेत फक्त 43. तीन पक्षात ती वाटणं म्हणजे माेठे ऑपरेशन. प्रत्येक आमदाराला मंत्री व्हायचंय. अडीच-अडीच वर्षाचा मंत्री असा व्यवहारी मार्ग अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी शाेधला आहे. पण त्यातूनही किती जणांचे समाधान हाेणार? महायुतीकडे 234 आमदार आहेत. भाजपामधले तर माेठे अवघड बाळंतपण हाेते. फडणवीसांनी माेठ्या कुशलतेने ते पार पडले.
Thackeray-Fadnavis-Nagpur तरीही काहींनी नाराजी दाखवलीच. अमित शाहांकडे प्रत्येकाची कुंडली आहे. त्यामुळे कुणी फार गडबड करणार नाही. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायची तर काही जुने चेहरे कापणे भाग आहे. यावेळी मंत्रिमंडळ बनवताना खुद्द अमित शाह यांनी लक्ष घातले. राजी-नाराजी पत्करून श्रेष्ठींनी सरकार दिले आहे. ज्यांना तिकिटं नाकारली त्यातल्या काहींना पक्ष वेगळ्या जबाबदारी देणार, असे खुद्द फडणवीस यांनी म्हटले आहे. आधीच्या सरकारमधील बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना यावेळी वगळले आहे. चव्हाण यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केले जाईल, असे संकेत मिळत आहेत. Thackeray-Fadnavis-Nagpur चव्हाण यांना फडणवीसांचे ‘हनुमान’ म्हटले जाते. संघ परिवारातले चव्हाण हे डाेंबिवलीचे आमदार आहेत. त्या हिशाेबाने काेकणी मतदार ओढण्याचे भाजपाचे टार्गेट आहे. विद्यमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात घेतले आहे. नागपूरचे बावनकुळे सरकारमध्ये चाैथ्या क्रमांकाचे मंत्री आहेत, ही गाेष्ट विदर्भासाठी अभिमानाची राहणार आहे. या आधीच्या 2014 च्या सरकारमध्ये बावनकुळे ऊर्जामंत्री हाेते. मागच्या निवडणुकीत त्यांचे तिकीट कापले गेले.
Thackeray-Fadnavis-Nagpur तरीही त्यांनी काम सुरू ठेवले. त्याचे बक्षीस त्यांना मिळाले आहे. 2019 मध्ये कापल्या गेलेल्या बावनकुळेंनी यावेळी भाजपाची तिकिटे वाटली. नेत्यांमध्ये संयम असेल तर त्याची बक्षिसी भाजपामध्ये मिळते, याचे बावनकुळे हे उत्तम उदाहरण आहे. वादग्रस्त तसेच कलंकित नेत्यांना यावेळी मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी ही काळजी घेतली हे विशेष. यवतमाळचे संजय राठाेड वाचले. बंजारा समाज फॅक्टर मदतीला आला. भाजपाच्या वाट्याला आलेल्या मंत्रिपदी झालेल्या नियुक्त्यांवर फडणवीस यांची स्पष्ट छाप दिसते. Thackeray-Fadnavis-Nagpur असे असले, तरी फडणवीसांच्याच मर्जीतले प्रवीण दरेकर, संजय कुटे, गाेपीचंद पडळकर, रवी राणा बाहेर आहेत, हे देखील वास्तव आहे. मंत्रिमंडळात भाजपाचे 20, शिंदे सेनेचे 12 आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 10 मंत्री आहेत. म्हणजे आता काेणाला घ्यायचे झाले तर फक्त एकाला घेता येते. बाकी मंत्रिमंडळ हाऊसुल्ल आहे. जुन्या-नव्याचा समताेल साधताना ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांना वगळले आहे. भुजबळांनी हा मुद्दा बनवला आहे.
Thackeray-Fadnavis-Nagpur ओबीसींवर हा अन्याय आहे, असे सांगितले जात आहे. मात्र, ओबीसी म्हणजे केवळ एक भुजबळ नाहीत. इतरही ओबाेसी नेते मंत्रिमंडळात घेतले आहेत. आपले अवतारकार्य संपले हे भुजबळांनी समजून घेतले पाहिजे. भुजबळ आज 77 वर्षांचे आहेत. भाजपामध्ये या वयातल्या नेत्याला ‘मार्गदर्शक मंडळात’ म्हणजे पेन्शनीत टाकले जाते. राष्ट्रवादी म्हणजे शरद पवारांकडे आहेत म्हणून एवढी ठाकूरकी चालली. आता अजितदादांचा जमाना आहे. Thackeray-Fadnavis-Nagpur दादा नाही तर त्यांना घेणार काेण? भाजपा घेणार नाही. कारण युतीधर्म. उद्धव ठाकरे यांची लहर भुजबळांना परवडणारी नाही. उरली काँग्रेस. भुजबळ काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. त्यापेक्षा त्यांनी रिटायर हाेणे त्यांचा प्रतिष्ठेला शाेभेसे हाेईल. अडचण तीच आहे. भुजबळच नव्हे तर शरद पवारही आपण म्हातारे झाल्याचे मानायला तयार नाहीत. त्यांना अजूनही वाटते… ‘लाेक माझे सांगाती!’