---Advertisement---

फडणविशी : भाजपाचा भविष्यातील चेहरा!

by team
---Advertisement---

Devendra Fadnavis-BJP अखेर सस्पेन्स संपला. तसा ताे नव्हताच. मात्र राक्षसी बहुमत मिळून 13 दिवस उलटले. तरीही महायुतीचे सरकार बनत नाही म्हणून लाेक अस्वस्थ हाेते. या विधानसभा निवडणुकीत भाजपाने 132 जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री भाजपाचाच हाेणार हे स्पष्ट हाेते. देवेंद्र फडणवीस यांनी एकहाती ही निवडणूक जिंकवून आणली म्हणून मुख्यमंत्री तेच हाेणार, हे स्पष्ट हाेते. पंतप्रधान नरेंद्र माेदींची मान्यता, संघाचा आग्रह, पाठीशी शंभरावर आमदारांचे सैन्य. असे सारे असतानाही घाेळ घातला गेला. Devendra Fadnavis-BJP अजितदादा त्रास देतील असे अनेकांना वाटले हाेते; मात्र ज्यांच्यासाठी फडणवीस यांनी अडीच वर्षांपूर्वी ‘त्याग’ केला, त्या एकनाथ शिंदेंनीच टेन्शन हाेते. चॅनेलवाल्यांना एवढे दिवस खाद्य मिळाले. ठीक आहे. राजकारणात प्रत्येकाला काही महत्त्वाकांक्षा असतात. शेवट गाेड झाला हे महत्त्वाचे. Devendra Fadnavis-BJP ‘मी पुन्हा येईन’ असे फडणवीस म्हणाले हाेते. त्यांनी शब्द निभवला. ‘समुद्र पुन्हा येताेय.’ त्यामुळे किनाऱ्यावर दुकानं लावू पाहणाऱ्यांची पळापळ सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक पिढी एका नेत्याभाेवती फिरते. यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक, वसंतदादा पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचे नेते म्हणून बघितले जायचे. कालपर्यंत हे स्थान शरद पवार अडवून बसले हाेते. या निकालाने शरद पवारांचे युग पूर्ण संपवले. उद्धव ठाकरे उत्तम फोटोग्राफर आहेत. Devendra Fadnavis-BJP आता लग्न-माैंजीच्या ऑर्डर घ्यायला ते माेकळे झाले आहेत. काँग्रेस काेमामध्ये आहे. सक्षम विराेधी नेता आहे कुठे? आताच्या पिढीत देवेंद्र फडणवीस हे नाव निर्विवादपणे नंबर एकवर आहे. वयाच्या 22 व्या वर्षी नगरसेवक, 27 व्या वर्षी सर्वात तरुण महापाैर, 1999 पासून सतत सहाव्यांदा आमदार, 2014 मध्ये मुख्यमंत्री, पुढे पहाटेच्या शपथविधीच्या 72 तासांचे मुख्यमंत्री आणि आता तिसèयांदा मुख्यमंत्री. राजकारणातील ही ‘फडणविशी’ आहे. त्यांच्या साेबत राजकारण सुरू करणारे बहुतेक नेते विस्मृतीत गेले. देवेंद्र धावताहेत. त्यांच्याकडे वय आहे, विकासाचा आश्वासक चेहरा आहे, क्षमता आहे, संघ परिवाराच्या संस्कारात वाढले आहेत; आणखी 25 वर्षे धावतील. संयमी, सुसंस्कृत पण पक्षहितासाठी विराेधकांवर तुटून पडणारा भाजपाचा हा नेता उद्याचे ‘पीएम मटेरियल’ आहे.

Devendra Fadnavis-BJP एकही मराठी नेता पंतप्रधान झाला नाही, याची महाराष्ट्राला खंत आहे. फडणवीस ती दूर करू शकतात. शपथविधीला त्यामुळेच महत्त्व आहे. देवेंद्र फडणवीसांनी असे काय केले की, पंतप्रधान नरेंद्र माेदी त्यांचा ‘परममित्र’ म्हणून उल्लेख करतात, असा प्रश्न बहुतेकांना पडताे. त्याच्या उत्तरासाठी 10 वर्षे मागे जावे लागेल… 2014 च्या निवडणुकीच्या धामधुमीचा ताे काळ हाेता. भाजपाने माेदींना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले हाेते. देश जिंकायचा तर महाराष्ट्र जिंकणे आवश्यक आहे, हे माेदींच्या चाणाक्ष नजरेने हेरले हाेते. माेदी नव्या चेहऱ्याच्या शाेधात हाेते. सर्वांना साेबत घेऊन काम करण्याची खुबी, कुठलाही अहंकार नाही, मात्र प्रचंड आत्मविश्वास या गुणांवर एक तरुण माेदींच्या मनात भरला. Devendra Fadnavis-BJP निवडणूक प्रचाराच्या नागपूरच्या सभेत माेदी म्हणाले हाेते, ‘‘हा तरुण नागपूरने महाराष्ट्राला दिलेला हिरा आहे.’’ हा ताेच हिरा आहे ज्याने सध्या विराेधकांची झाेप उडवली आहे. शरद पवारांचे 50 वर्षांचे घराेडी राजकारण संपवले आहे. ‘मी राहीन किंवा तू राहशील’ अशा भाषेत ललकारणाऱ्या उद्धव ठाकरेंना घरी बसवले आहे. फडणवीसांनी मग काय वेगळे केले?

चाेवीस तास राजकारण करणाऱ्या नेत्याने जे करायला हवे, तेच फडणवीसांनी केले. माेदी युगात राजकारण हा पार्ट टाईम जाॅब नाही. प्रचंड परिश्रम घेऊन टार्गेटचा पिच्छा करायचा हा भाजपाच्या आजच्या यशाचा मंत्र आहे. फडणवीसांनी आपल्या नेत्यांचे ‘वर्क कल्चर’ स्वीकारले, त्यावर स्वतःचा ‘तडका’ मारला. फडणवीसांचे आजचे जे नेतृत्व तुम्हाला दिसते, ती गेल्या 10 वर्षांतील त्यांची कमाई आहे. प्रमाेद महाजन, गाेपीनाथ मुंडे यांच्या तालमीत तयार हाेताना त्यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षापर्यंत धडक मारली. थेट नरेंद्र माेदींशी संपर्क आला. Devendra Fadnavis-BJP माेदींनी संधी दिली आणि फडणवीसांनी त्या संधीचे साेने केले. माेदींनी त्यांना कुठलेही जास्तीचे अधिकार दिले नव्हते. पण तल्लख बुद्धी, समयसूचकता आणि आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय प्रत्यक्षात उतरवताना फडणवीसांनी दाखवलेली धमक काैतुकाचा विषय झाली. या निवडणुकीची लढाई तर त्यांनी एकहाती लढली. सामाजिक समीकरणांना छेद देत केवळ स्वत:लाच नव्हे, तर भाजपालाही सिद्ध केले. त्यामुळेच माेदी छायेतल्या अनेक बड्या नेत्यांना मागे सारून स्वतःला महाराष्ट्राचा निर्विवाद नेता म्हणून माेठी झेप घेतली.

समृद्धी महामार्ग, जलयुक्त शिवार, मेट्राे रेल्वेचे जाळे, मुंबईचा काेस्टल राेड, विकासाचे अनेक प्रकल्प सांगता येतील. आत्मविश्वास असेल तर नेते स्वयंप्रेरणेने काम करू शकतात, हे दाखवून देताना फडणवीसांनी स्वतःची निर्णय क्षमता सिद्ध केली आहे. 2014 पासून सलग पाच वर्षे देवेंद्र मुख्यमंत्री हाेते. या आधी वसंतराव नाईक सलग 11 वर्षे मुख्यमंत्री राहिले आहेत. शरद पवार चारदा मुख्यमंत्री हाेते.Devendra Fadnavis-BJP मात्र, त्यांनाही सलग पाच वर्षे मुख्यमंत्रिपद टिकवता आले नव्हते. पवारांना जमले नाही ते फडणवीसांनी करून दाखवले. राज्य चालवण्याचा कुठलाही अनुभव नसताना फडणवीसांना हे कसे जमते, असा प्रश्न तुम्हालाही पडत असणार. तीच फडणवीसांची खासियत आहे. त्यांची एक खुबी आहे. ते विराेधकांना चूक करू देण्याची वाट बघतात. त्यांच्याशी पंगे घेणाऱ्या अनेक नेत्यांनी शरणागती पत्करली. ‘कल का छाेकरा’ म्हणत एकनाथ खडसेंनी फडणवीसांशी पंगा घेतला. त्या नादात खडसे केव्हा संपले ते त्यांनाही कळले नाही.

अनेक नेत्यांवर घाेटाळ्याचे आराेप झाले. मात्र फडणवीसांवर कुठला आराेप करण्याचे धाडस विराेधकांना झाले नाही, हे विशेष! राजकारणात फक्त ‘गाॅडादर’ असून भागत नसते. त्याने दिलेल्या संधीचे साेने करण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. त्यांनी ते उपसले. 18-18 तास काम करून त्यांनी स्वतःची जागा निर्माण केली. Devendra Fadnavis-BJP ती जागाच आज त्यांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून खुणावते आहे. 2019 ची निवडणूक भाजपा आणि शिवसेना यांनी युती करून लढवली हाेती. युतीला बहुमतही मिळाले हाेते. पण उद्धव ठाकरेंनी दगा दिला. मुख्यमंत्री व्हायच्या नादात शरद पवारांच्या जाळ्यात अडकले. त्या धुंदीत हिंदुत्व साेडले. पवार म्हणा की उद्धव म्हणा, दाेघांनीही फडणवीसांना टार्गेट केले हाेते. फडणवीसांना राेखले नाही तर आपले राजकारण संपणार, हे ओळखून पवारांनी उद्धव ठाकरेंना पुढे केले हाेते. उद्धव बिनकामाचे निघाले हे खुद्द पवारांनी आपल्या पुस्तकात लिहिले आहे. तरीही फडणवीसांना संपवण्यासाठी त्यांनी महाविकास आघाडीचे भूत उभे केले हाेते.

फडणवीसद्वेष हाच त्यांचा अजेंडा हाेता. भाजपाच्या विकास कामांना स्थगिती देण्यापलीकडे यांनी काही केले नाही. अडीच वर्षांतच ठाकरे सरकार काेसळले तेव्हा पवारांनी मराठा आरक्षणाच्या बहाण्याने फडणवीसांना घेरू पाहिले. Devendra Fadnavis-BJP या आधुनिक अभिमन्यूने तेही चक्रव्यूह भेदले. कुठल्याही नेत्यावर एवढे हल्ले झाले नसतील जेवढे प्रहार फडणवीसांनी झेलले आहेत. फडणवीसांनी आपल्या कारकीर्दीत मराठा आरक्षण करून घेतलं हाेतं. हायकाेर्टात ते टिकवूनही दाखवलं. 2019 मध्ये त्यांचे सरकार राहिले असते तर ते त्यांनी सुप्रीम काेर्टातही टिकवलं असतं. मात्र ते शरद पवारांना नकाे हाेतं. समाजाचा एक नेता सर्व जातींचा नेता हाेताे, हे पवारांच्या डाेळ्यात खुपत हाेतं. मनाेज जरांगे पाटलांना काेणी उचकवलं? ते आता बाहेर येत आहे. पण आता जरांगे हंगामा करू शकणार नाहीत. आपला माणूस काेण हे आता मराठ्यांनाही उमगले आहे.

– माेरेश्वर बडगे

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment