अपायकारक पदार्थांचा निचरा न झाल्यास मेंदूवर दुष्परिणाम, वाढतो विस्मरणाचा धोका, अभ्यासातून निष्कर्ष समोर

---Advertisement---

 

नवी दिल्ली : मानवी शरीरातील अपायकारक घटक बाहेर पडणे म्हणजे ‘डिटॉक्स’ होणे ज्याप्रमाणे गरजेचें असते त्याप्रमाणे मेंदू देखील स्वच्छ होणे गरजेचे असते. मेंदूतील अपायकारक घटक आणि प्रोटीन वेळेवर बाहेर न पडल्यास मेंदूच्या पेशींवर दुष्परिणाम होतो. परिणामी स्मरणशक्ती कमी होते, असा निष्कर्ष नवीन वैज्ञनिक अभ्यासात काढण्यात आला आहे ‘वेस्ट क्लिअरन्स’ प्रणाली म्हणजेच मेंदूतील कचरा आणि अपायकारक प्रोटीन बाहेर टाकण्याची नैसर्गिक यंत्रणा होय. ही प्रक्रिया मेंदूच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.

या प्रक्रियेत अडथळा आल्यास मेंदूत अपायकारक पदार्थ साठू लागतात. परिणामी मेंदूच्या पेशींमध्ये सूज येते. मेंदूचे नुकसान होते आणि अखेरीस विस्मरणासारखे आजार होऊ शकतात. अपूरी निद्रा आणि हृदयविकाराच्या जोखमीमुळे मेंदूतील अपायकारक घटक बाहेर पडण्यहची प्रक्रिया अधिक मंदावते. यानेही विस्मरणाचा धोका वाढतो.

पुरेशी आणि योग्य झोप, हृदयाचे आरोग्य राखणे याने विस्मरण म्हणजेच डिमेन्शियाचा धोका कमी होतो. या नैसर्गिक प्रकियेत अडथळा निर्माण झाल्यास अल्झायमर आणि डिमेन्शिया सारखे आजार होण्याचा धोका वाढतो, असे वैज्ञानिकांचे निरीक्षण आहे. स्मरणशक्ती टिकवण्यासाठी झोपेची काळजी तसेच सवयी सुधारणे, हृदयाचे आरोग्य राखावे आणि तणाव टाळावा, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.

मेंदूच्या आरोग्यासाठी शारीरिक स्वास्थ्य गरजेचे

मेंदूच्या आरोग्यासाठी योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. डिमेन्शिया टाळण्यासाठी मेंदूतील अपायकारक घटक बाहेर पडणे गरजेचे आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---