तोतया तिकीट निरीक्षकाला पुणे-दानापूर एक्स्प्रेसमध्ये बेड्या

भुसावळ : भुसावळ : १२१५० पुणे-दानापूर एक्स्प्रेसच्या सर्वसाधारण डब्यात स्वतःला तिकीट निरीक्षक म्हणून भासवणाऱ्या भामट्याने प्रवाशांची अचानक तिकीट तपासणी सुरू करीत त्यांच्याकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. काही प्रवाशांनी ही बाब पुणे वाणिज्य कक्षाला कळवल्यानंतर नियंत्रण कक्षाने तातडीने गाडीतील दोघा तिकीट निरीक्षकांना याबाबत खातरजमा करण्याच्या सूचना केल्या व सर्वसाधारण डब्यातून संशयिताला ताब्यात घेऊन दौंड रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले. सचिन दिवेकर (३०, दौंड) असे अटकेतील संशयिताचे नाव आहेल संशयिताचे नाव आहे.

तोतया तिकीट निरीक्षकाकडून तिकीट तपासणी भुसावळ विभागाचे तिकीट तपासणी कर्मचारी अवधीश कुमार ए. पी. सिन्हा आणि जी. टी. साबरे हे शुक्रवार, १२ जुलै २०२४ रोजी ट्रेन १२१५० वर कर्तव्यावर असताना भुसावळ- पुणे दरम्यान अहमदनगरमध्ये बनावट तिकीट तपासणी कर्मचारी सर्वसाधारण बोगीतील प्रवाशांकडून अवैधरीत्या पैसे गोळा करीत असल्याची माहिती. पुणे वाणिज्य नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यांनी उभय तिकीट निरीक्षकांना खातरजमा करून कारवाईचे सांगितल्यानंतर सर्वसाधारण डब्यात दोघा तिकीट निरीक्षकांनी तोतया तिकीट निरीक्षकाला ओळख विचारून ओळखपत्र दाखवण्यास सांगितल्यानंतर संबंधित भांबावला व त्याचे बिंग उघडे पडताच त्यास पॅन्ट्री कारमध्ये नेण्यात आले व दौंड आल्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाच्या ताब्यात देण्यात आले. सचिन दिवेकर (३०, दौंड) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.