जळगाव : कुटुंबातील सदस्य बाहेर गेल्यानंतर तरुणाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवार 25 रोजी दुपारी निमखेडी येथे घडली. गणेश रामचंद्र सपकाळे (45) असे मृताचे नाव आहे. मयताच्या बहिणीने घराचा दरवाजा ढकलला त्यानंतर ही घटना समोर आली. 4.45 वाजता याबाबत तालुका पोलिसांना खबर मिळाली. पोहेकॉ गुलाब माळी, पोहेकॉ लीलाधर महाजन, पोहेकॉ प्रकाश चिंचोले यांनी घटनास्थळी धाव घेत गणेश यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती मृत घोषित केले. गणेश हे स्वयंपाकी कारागीर होते. मयताच्या पश्चात आई, वडील, बहिण असा परिवार आहे.