प्रसिद्ध किर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या सासू बाईना मिळाला सरपंच पदाचा बहूमान !

तरुण भारत लाईव्ह न्यूज : राज्याभरातील ७ हजार १३५ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. राज्य भरातील या ग्रामपंचायत निवडणुकीच्या लढतीत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यातील निळवंडे ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या लढतीत महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व विनोदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधक इंदोरीकर महाराज  यांच्या सासूबाई शशिकला शिवाजी पवार विजयी झाल्या आहेत.

. नारळ या चिन्हावर निवडणूक लढवत शशिकला पवार या निळवंडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी विराजमान झाल्या आहेत.अपक्ष उमेदवारी दाखल करत शशिकला निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. शशिकला पवार यांनी सुशीला उत्तम पवार यांचा पराभव करून. 227 मतांनी विजयी झाल्या आहेत.

महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध व विनोदी कीर्तनकार आणि समाज प्रबोधक म्हणून इंदोरीकर महाराज यांची ओळख आहे. त्यांचे मूळ नाव निवृत्ती काशिनाथ देशमुख असून अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील इंदोरी हे त्यांचे गाव आहे. या गावाच्या नावावरूनच त्यांना ‘इंदोरीकर महाराज’ असं नाव पडलं.