तळोदा : शहादा येथे आज १ एप्रिल ते ५ एप्रिलदरम्यान प्रसिद्ध कथावाचक प्रदीप मिश्रा यांच्या कथेचे आयोजन करण्यात आले आहे. तळोदा शहरात भव्य शोभायात्राचे आयोजन करण्यात आले. या वेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
तळोदा आणि परिसरातील शिवभक्तांना प्रदीप मिश्रा यांच्या दर्शनाचा लाभ व्हावा, यासाठी ३१ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेदरम्यान तळोद्यात शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही शोभायात्रा दत्त मंदिरापासून सुरू होऊन बिरसा मुंडा पर्यत काढण्यात आली. या वेळी शिवभक्तांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
प्रदीप मिश्रा यांच्यावर चौका-चौकात शिवभक्तांकडू पुष्पवृटी करण्यात आली. या वेळी आमदार राजेश पाडवी, भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. शशिकांत वाणी, माजी नगराध्यक्ष अजय परदेशी, भाजप शहराध्यक्ष गौरव आणि जितेंद्र सूर्यवंशी, जगदीश परदेशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते, प्रचंड जन समुदाय उपस्थित होता.
या वेळी काही भविक महाराजाचे जवळून दर्शन झाल्याने ‘माय बाबांनो, दर्शन एकदम जोडतीन होईनो, त्यामुळे मी धन्य होई गई’, असे वाक्य शहरातील म्हाताऱ्या आजींकडून व्यक्त करण्यात येत होते. दरम्यान, या शोभायात्रेत खिसा पाकीट, चैन स्नॅपिंग यांचे चांगले फावलेदरम्यान जवळ पास १० ते १५ लाख सोने रोकड गेल्याचे समजते.