---Advertisement---
शहादा : तालुक्यातील वैजाली काथर्दा रस्त्याच्या बाजुला असलेल्या शेतात विद्युत तारांच्या शॉक लागल्याने शेतमजुराचा मृत्यू झाल्याची घटना घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की, आज दि. २० रोजी सकाळी ७ वाजता मधुकर राजाराम पाटील (वय ७०) हे निर्मर्ला पाटील यांचे शेतात नांगरणी करण्यासाठी गेले होते. मधुकर राजाराम पाटील हे शेतात बेशुध्द अवस्थेत अल्युमिनीयमचे तार गळ्यात अडकुन पडलेले आढळून आले. वैजाली कार्दा रस्त्याचे बाजुला असलेल्या शेतात जावुन पाहिले असता शेतात इलेक्ट्रिकचे तीनही तार पडलेल्या दिसल्या व मधुकर पाटील हे त्या विद्युत पोलवरील इलेक्ट्रिक तारच्या खाली इलेक्ट्रिक शॉक लागून मरण पावलेल्या स्थित मिळून आले.
---Advertisement---
पोलीसांना कळवून गावकऱ्यांनी मधुकर पाटील यांचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्र प्रकाशा येथे शवविच्छेदनासाठी आणला. दि. २० रोजी ८ वाजेच्या सुमारास वैजाली ते काथर्दा रस्त्याचे बाजुला असलेले निर्मर्ला पाटील यांचे मका लावलेले शेतात नांगरटी करण्यासाठी गेले होते. शेतातच पडलेल्या विद्युत पोलच्या इलेक्ट्रिकच्या तारा मधुन मधुकर पाटील यांना इलेक्ट्रिकचा शॉक लागल्याने ते मरण पावले. याबाबत जितेंद्र पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.