पेरणी खर्चात वाढ, जिल्हाभरातील शेतकऱ्यांमध्ये रोष, खरीप हंगामापूर्वीच बियाणे, खतांचे दर तेजीत

---Advertisement---

 

एकीकडे खरीप रब्बी हंगामात शेत मशागत आणि कापूस वेचणीसह अन्य कामांना तोंडाचा दाम देऊनही वेळेवर मजूर मिळत नाहीत. कमी-जास्त पर्जन्यमानामुळे शेतमालाचे झालेले नुकसान आणि त्यातून शेतमालाचे घसरलेले दर या समस्यांनी शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. मात्र, सद्यःस्थितीत खरीप हंगामापूर्वीच बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या किमतीमुळे पेरणी खर्चात किमान २०० ते ३०० रुपयांपर्यंत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे.

आर्थिक जुळवाजुळव करण्याची चिंता शेतकऱ्यांमध्येही दिसून येत आहे. या वर्षी मे महिन्यादरम्यान बेमोसमी पावसाने हजेरी लावलेली आहे. काहींनी तर असा दावा केला आहे की, मान्सून लवकर सुरू झाला आहे. त्यामुळे काही ठिकाणी शेतमशागतीला चालना दिली गेली आहे. यानंतर वेळेत दाखल होत असल्याने खरीप हंगामात निसर्गाची कृपादृष्टी राहणार आहे.

परिणामी शेतकऱ्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे रासायनिक खते, बी-बियाण्यांच्या किमतीत सरासरी २०० ते ३०० रुपयांपर्यंत प्रतीगोणी वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरणी खर्चात वाढ होणार आहे. खतांच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजी पसरली आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना जून महिन्यात सुरुवात होईल. त्यापूर्वी या वर्षी बऱ्याच ठिकाणी बागायती कपाशीच्या बियाण्याचे वाण बाजारपेठेत उपलब्ध झाले असून लागवडदेखील केली जात आहे. तर दुसरीकडे शेतीच्या पेरणीपूर्व मशागतीस शेतकयांकडून वेग दिला गेला आहे.

यंदा जिल्ह्यात खरिपाचे सव्वासहा लाख हेक्टर क्षेत्र आहे. यात कपाशी वाणाचे प्राधान्य असून त्यासोबतच मका, सोयाबीन, भुईमूग, ज्वारी, बाजरी, मूग, मठ आदींची पेरणी होते. त्यासाठी बियाण्यांचा मुबलक साठा कृषी कंपन्यांकडून उपलब्ध झाला आहे. रासायनिक खतांचे लिंकिंग होऊ नये, शेतकऱ्यांना खते पुरेशा प्रमाणात मिळावीत, यासाठी कृषी विभागाचे नियोजन आहे.

मात्र दुसरीकडे मका बियाण्यांच्या किम तीत प्रती किलो १०० ते १५० रुपयांची वाढ झाली आहे. तर खतांमध्ये युरिया वगळता अन्य रासायनिक खतांच्या किमतीत प्रतीगोणी १५० ते २०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे.

---Advertisement---

 

वाहतूक खर्च अन् हमालीचा प्रश्न

रासायनिक खतांची विक्री ही कंपनीने निश्चित केलेल्या दरानेच करणे बंधनकारक आहे. यात वाहतूक खर्च व हमाली समाविष्ट केलेली नाही. त्यामुळे हा खर्च विक्रेत्यांना करावा लागतो. परिणामी, कंपनीने निर्धारित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने विक्रेत्यांकडून रासायनिक खतांची विक्री केली जाते. याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---