जळगाव : प्रधानमंत्री कुसुम योजनेंतर्गत सौर पंपासाठी अर्ज करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांच्या भ्रमणध्वनीवर फसवे संदेश पाठवले जात आहेत. यातून शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची शक्यता असून या संदेशापासून सावध राहावे, असे आवाहन महाऊर्जाच्या अपर महासंचालकांनी केले आहे, अशी माहिती जिल्हा व्यवस्थापक शिवाजी बोडके यांनी दिली.
शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य व्हावे यासाठी राज्यातील शेतकऱ्यांना कृषि वापरासाठी पारेषण विरहित सौर कृषिपंप अनुदान तत्वावर उपलब्ध करुन देण्यात येत आहेत. या योजनेंतर्गत ३, ५ व ७.५ एच.पी क्षमतेचे सौर कृषिपंप ९० ते ९५ टक्के अनुदानावर उपलब्ध आहेत.
सौर कृषिपंपांसाठी पात्र लाभार्थ्यांना पंपाच्या क्षमतेनुसार खुल्या प्रवर्गातील शेतक-यास १० टक्के आणि अनुसूचित कुसुम योजना जाती / अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यास ५ टक्के लाभार्थी हिस्सा भारण्यासाठीचा पाठविला जातो. राज्य शासनाने या योजनेसाठी महाऊर्जास १०४८२३ सौर कृषिपंपांसाठी मान्यता दिली.
सदर मान्यतेनुसार महाऊर्जमार्फत लोकसंख्येनुसार जिल्हानिहाय उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. म हाऊर्जामार्फत सद्यः स्थितीत सुमारे ७५७७८ सौर कृषिपंप आस्थापित करण्यात आले आहेत.