---Advertisement---

खुशखबर! शेतकऱ्यांना आता कृषी संबंधित समस्यांसाठी थेट योग्य अधिकाऱ्यांशी साधता येणार संपर्क

---Advertisement---

जळगाव : खरीप हंगाम २०२४ मध्ये बियाणे, खते, कीटकनाशके निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्ता बाबत तक्रारींचे निराकरण करण्याकरिता शेतकऱ्यांच्या प्राप्त होणाऱ्या तक्रारी यांची रजिस्टर मध्ये नोंद घेण्यात येणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील किंवा तालुक्यातील कृषी संबंधित समस्यांसाठी योग्य अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे अधिक सोपे होणार आहे.

जिल्हा परिषदेने याबाबत माहिती सार्वजनिक केली आहे. यामध्ये तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), सहाय्यक कृषी अधिकारी आणि मोहळ अधिकाऱ्यांची नावे, पद आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषद येथे विजय दत्तू पवार (९४२३४८२२७४), मोहीम अधिकारी आणि राहुल अनिल महाजन (९६०४८४९४४४), कृषि अधिकारी, अभिमान किशोर माळी (९४२२२३५८१३) हे जिल्हा कृषि अधिकारी (सा.) म्हणून कार्यरत आहेत.

पंचायत समिती, जळगाव येथे धीरज कडू बढे (९६२३३५३८५०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि सुनील दांडगे (८८०६०३५१७४), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, भुसावळ येथे कपिल सुरवाडे (९९६०३५१९७५), विस्तार अधिकारी (कृषि) आणि ज्ञानेश्वर जयंकर (९७६५२८२८३६), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, यावल येथे धीरज कडू बढे (९६२३३५३८५०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि गोकुळ तुकाराम सोनवणे (९१७२३८९४९९), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, रावेर येथे लक्ष्मण पाटील (८८३०२३३७०५), कृषि अधिकारी आणि भूषण पाटील (७२१८९१९२४८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, मुक्ताईनगर येथे संजोग भारती (९५२७१५२७५४), विस्तार अधिकारी (कृषि) आणि हिरालाल वाघ (८८३०३७३८८५), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, बोदवड येथे प्रदीप धांडे (९४२३७७०६०६), कृषि अधिकारी कार्यरत आहेत. पंचायत समिती, पाचोरा येथे मारोती भालेराव (७५८८०५२१००), कृषि अधिकारी आणि गिरीश कोकणी (९८५०७२७०३५), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, भडगाव येथे ईश्वर देशमुख (७५८८५७९६७०), विस्तार अधिकारी (कृषि) आणि दीपक निकुंभ (९४२२२३२११८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहे. पंचायत समिती, चाळीसगाव येथे प्रदीप महाजन (९३०७४०७०४०), कृषि अधिकारी आणि गौरव पोखरणा (९८८१६८१३३१), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, जामनेर येथे राजु ढेपले (९४०३८०६६७६) कृषि अधिकारी व जयेश शिरसाठ (७०२००६९१५९), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत

अमळनेर येथे देवेंद्र ठाकूर (८६६८२६३९९२), कृषि अधिकारी व अमोल भदाणे (८६९८३५८९६८), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, चोपडा येथे किरण उत्तम पाटील (९४२३४५२२६०), विस्तार अधिकारी (कृषि) व प्रदीप जगन्नाथ अहिरे (९४२०३२५२४२), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, पारोळा येथे दिनेश प्रकाश कोते (९४२१७५०८१५), विस्तार अधिकारी (कृषि) व संदीप सुपडू पाटील (७५८८८१५८४२), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, एरंडोल येथे भारत शामराव मोरे (८२०८२४८००५), कृषि अधिकारी व रूपचंद कौतिक पटाईत (८४०८८२०८४४), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत. पंचायत समिती, धरणगाव येथे सुनिल प्रभाकर मोरे (९४२०२१४९५६), कृषि अधिकारी तसेच योगेंद्र अहिरे (७५८८६८६२१०), विस्तार अधिकारी (कृषि) कार्यरत आहेत.

या संपर्क माहितीमुळे शेतकऱ्यांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळवणे, कृषी मार्गदर्शन घेणे, तसेच पिकांवरील रोग व किडींच्या नियंत्रणासाठी योग्य सल्ला मिळवणे शक्य होणार आहे.

तक्रार निवारण कक्ष हे खरीप हंगाम २०२४ साठी दिनांक १५ मे २०२५ ते १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीसाठी सकाळी १०.०० ते सायंकाळी ०७.०० पर्यंत कार्यरत राहणार आहे. संपर्क यादी जिल्हा परिषदेच्या कार्यालयात तसेच संबंधित पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment