---Advertisement---
जळगाव : खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असताना विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांना वेठीस धरले जात आहे. लिंकिंगसह अवाजवी दराने खतांची विक्री करीत शेतकऱ्यांची लूटही सुरू आहे. त्यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने इलाज शोधून काढला आहे. आता मोबाईल लिंकवर ‘क्लिक’ करताच संबंधित तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या खत साठ्याची माहिती दिसणार आहे. त्यामुळे साठा उपलब्ध नाही, असे सांगणाऱ्या विक्रेत्यांवर ‘बाप दाखव, नाही तर श्राद्ध कर’ असाच प्रसंग ओढवणार आहे.
जि.प.च्या कृषी विभागाने अमळनेर तालुक्यात कृषी केंद्रावर डमी ग्राहक पाठवून पडताळणी केली. तेव्हा साठा उपलब्ध असतानाही संबंधित विक्रेत्याने नकार दिल्यानंतर सुरू असलेल्या खतांच्या काळ्याबाजारावर शिक्कामोर्तब झाले. यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने इलाज शोधून काढला असून, आता मोबाईल लिंकवर ‘क्लिक’ करताच संबंधित तालुक्यातील विक्रेत्यांकडे उपलब्ध असलेल्या खत साठ्याची माहिती दिसणार आहे.
काय करावं लागणार ?
शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या https://adozpjalgaonfertilizer.blogspot.com/p/ado -zp-fertilizer-stock-jalgaon.html या लिंकवर जावे लागेल. त्याठिकाणी तालुक्याची निवड केल्यानंतर कृषी केंद्रांवर उपलब्ध असलेल्या खतांच्या साठ्याविषयी माहिती उपलब्ध होणार आहे. म्हणून या कृषी विभागाने आता दैनंदिन खतांच्या साठ्याची तालुकानिहाय माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावी, यासाठी एक मोबाईल लिंक विकसित केली आहे.