जळगाव । शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे झेलम एक्सप्रेसच्या जालंधरजवळ झालेल्या विलंबामुळे प्रवाशांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या असल्याची माहिती समोर येत आहे.
तब्बल 11 तासानंतर झेलम एक्सप्रेस आता पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली असून, याबाबत जळगावच्या काही प्रवाशांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे पुण्याहून जम्मूकडे जाणारी झेलम एक्स्प्रेस जालंधर कँटमध्ये थांबवण्यात आली. शनिवारी पुण्याहून सुटलेली एक्स्प्रेस सोमवारी जालंधरला पोहोचली.
या ट्रेनमधून प्रवास करणारे प्रवासी गेल्या तीन दिवसांपासून प्रवास करत आहेत. त्यांना जालंधरमध्ये दुपारी चार वाजेपर्यंत थांबावे लागले. तब्बल 11 तासानंतर झेलम एक्सप्रेस आता पठाणकोटच्या दिशेने रवाना झाली आहे.
याबाबत जळगावच्या काही प्रवाशांनी व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मात्र, रेल्वे प्रशासनाने याबाबत अधिकृत स्पष्टीकरण अद्याप दिले नाही.
दरम्यान, गाडीत प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांची गैरसोय झाली असून, अन्न व पाण्याच्या सुविधांचा अभाव जाणवला. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण दिसून आले आहे.
रेल्वे प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे, असे प्रवाशांनी मत व्यक्त केले आहे.