खुशखबर ! ‘आरबीआय’ने शेतकऱ्यांना दिली मोठी भेट, वाचा काय आहे ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. विशेषतः पाच वर्षांनंतर हा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा म्हणून पाहिले जात आहे.

काय आहे घोषणा ? 
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने छोट्या आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी विनातारण कर्ज मर्यादेच्या रकमेत वाढ केली आहे. आता शेतकऱ्यांना विनातारण 2 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे.

यापूर्वी किती होती मर्यादा
यापूर्वी ही मर्यादा 1.6 लाख रुपये होती. आता ज्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंत कर्जाची गरज आहे त्यांना कोणतीही मालमत्ता गहाण न ठेवता हे पैसे मिळू शकतील. मात्र, त्यांना ओळख आणि इतर महत्त्वाच्या कामांसाठी इतर कागदपत्रे द्यावी लागतील.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (आरबीआय) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग 11व्यांदा पतधोरणात कोणताही बदल केला नाही. तो 6.5 टक्क्यांवर ठेवला. मात्र, अर्थव्यवस्थेत रोख वाढवण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बँकेने सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) ४.५ टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला. या पावलामुळे बँकांमध्ये १.१६ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे.

CRR अंतर्गत, व्यावसायिक बँकांना त्यांच्या ठेवींचा एक विशिष्ट भाग केंद्रीय बँकेकडे रोख राखीव म्हणून ठेवावा लागतो. यासोबतच सध्याची परिस्थिती पाहता आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांवर आणला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील किरकोळ महागाईचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 4.8 टक्के वर्तवला आहे.