शेतकऱ्यांची चिंता वाढली: राज्यात ‘या’ भागांत अवकाळी पावसाची शक्यता

मुंबई : उत्तर भारतात हाडं गोठवणाऱ्या थंडीचा अनुभव नागरिक घेत आहे. राज्यातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीचं प्रमाण वाढलं आहे. थंडीसह आज राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या ढगाळ वातावरणामुळे अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण असल्याने काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात ढगाळ वातावरण आहे.

काय म्हटलंय हवामान विभागाने?
आग्नेय उत्तर प्रदेश ते पश्चिम विदर्भापर्यंत बदललेल्या वातावरणामुळे पुढील दोन दिवसांत दक्षिण मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे मात्र शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.