---Advertisement---

Dhule News: शिरपूर रस्त्यावर पिकअप आणि ट्रकचा भीषण अपघात; २० वर्षीय विद्यार्थी जागीच ठार

by team
---Advertisement---

पिकअप आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून काही विद्यार्थी जखमी झाल्याची घटना शिरपूर -शहादा रस्त्यावरील हिंगणी गावाजवळ घडली आहे. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

शिरपूर शहरातील आर सी पटेल प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असलेले विद्यार्थी खासगी वाहनाने शाळेत ये जा करतात. नेहमीप्रमाणे सदरील वाहन तोरखेडा येथून विद्यार्थ्यांना घेऊन शिरपूर शहादा रस्त्याने शिरपूर येथे जात असताना अचानक मागून आलेल्या भरधाव ट्रकने या वाहनाला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की यात एका विद्यर्थ्याचा जागीच मृत्यू झाला असून अन्य विद्यर्थी गंभीर जखमी झाले आहेत.

हेही वाचा : …पण मला जिवंत ठेव दादा; स्वारगेट अत्याचार प्रकरणात पीडितेचा पोलिसांत जबाब

शालेय विद्यार्थ्यांच्या वाहनाला झालेल्या या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. तर काही विद्यार्थी जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात इंजिनीअरिंग कॉलेजचा विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रशांत भगवान घोरपडे( २० ) या विद्यर्थ्याचा जागीच मृत्यू झाला तर अन्य विधार्थी गंभीर जखमी झाले आहेत. जखमी विद्यार्थ्यांना शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनास भरधाव ट्रकने मागून जोरदार धडक दिली. यात २० वर्षीय प्रशांत भगवान घोरपडे या विद्यर्थ्याचा जागीच मृत्यू झाला. मृत प्रशांत घोरपडे यांचा मृतदेह शहादा येथे रवाना करण्यात आला आहे. प्रशांतच्या जाण्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment