रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

तरुण भारत लाईव्ह ।११ मार्च २०२३। येणपे गावाजवळील लोहारवाडी परिसरात रिक्षा आणि ट्रॅक्टरचा अपघात होवून एकाच कुटुंबातील आई-वडिलांसह एक मुलगी ठार झाली, तर मुलगा जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी तिथं धाव घेवून रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु केली. रिक्षा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, पुण्यावरून यात्रेसाठी पनुंद्रे इथं रिक्षानं निघाले असताना आज सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. सुरेश सखाराम महारुगडे (वय 39), सु्वर्णा सुरेश महारुगडे (34), समिक्षा सुरेश महारुगडे (13) हे ठार झाले असून समर्थ सुरेश महारुगडे (17) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

येणपे गावाजवळील लोहारवाडी परिसरात आल्यावर रिक्षा आणि कऱ्हाडकडं निघालेल्या ट्रॅक्टरची धडक झाली. त्यामध्ये रिक्षाचा पूर्ण भाग दबला गेला. त्यामुळं रिक्षातील सर्वजण अडकले होते. अपघाताची माहिती होताच परिसरातील ग्रामस्थांनी तिथं धाव घेवून रिक्षात अडकलेल्यांना बाहेर काढण्याची कार्यवाही सुरु केली.