नायजेरियात बस आणि ट्रेनचा भीषण अपघात; सहा जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी

तरुण भारत लाईव्ह ।१० मार्च २०२३। नायजेरियामधून एका अपघाताची बातमी समोर येतेय. नायजेरियात बस आणि ट्रेनचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत.

सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, बस सरकारी कर्मचाऱ्यांना कामावर घेऊन जात असताना इंटरसिटी ट्रेनला धडकली. या अपघातात अनेकजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बस चालकाच्या बेजबाबदारपणामुळे हा अपघात झाल्याची माहिती आहे. बस ट्रेनला धडकण्यापूर्वी बस चालकाने ट्रेनचा ट्रॅफिक सिग्नल मोडण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांच्या मते, नायजेरियन शहरांमध्ये ट्रेन आणि ट्रकचे अपघात सामान्य आहेत. येथे वाहतुकीचे नियम सहसा नीट पाळले जात नाहीत.