भररस्त्यात बाप-लेकावर जीवघेणा हल्ला; मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

मुक्ताईनगर : तालुक्यातील बेलसवाडी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या वादाचे निमित्त साधून एका आरोपीने भररस्त्यात पिता-पुत्राला अडवून त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेत मुलावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले असून, तो गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रवींद्र भागवत कोळी (वय ३६, रा. बेलसवाडी) हे त्यांचा मुलगा नीरज याच्यासह कारने (क्र. एम.एच.१५ डीसी-७७७२) गावातीलच एका व्यक्तीचे उसने घेतलेले पैसे परत करण्यासाठी जात होते. सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास रमजान यांच्या गॅरेजसमोर संशयित आरोपी जितेंद्र पुंजाजी कोळी याने “तुम्ही माझे नातेवाईक असलेल्या महिलेच्या नादी का लागत आहात ? असा जाब विचारत आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. आरोपीने रवींद्र कोळी व त्यांच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी आणि चापठ्यांनी मारहाण केली. इतक्यावरच न थांबता, संशयित आरोपीने जवळ असलेल्या एका धारदार वस्तूने नीरजच्या डाव्या बगलेच्या खाली वार करून त्याला गंभीर जखमी केले. घटनेनंतर फिर्यादीने तातडीने मुक्ताईनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी संशयित आरोपी जितेंद्र कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---