Beed: धाराशीव जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली असून, विवाहित तरुणाला प्रेमप्रकरणातून बोलावून घेत त्याचा निर्घृण खून करण्यात आला. नंतर मृतदेह महामार्गावर फेकून अपघाताचा बनाव करण्यात आला. धाराशीव जिल्ह्यात ही घटना असून हत्या झालेला तरुण हा बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील आहे.
बीड जिल्ह्यातील साळेगाव येथील मुस्तकिन जब्बार शेख (वय ३०) हा धाराशिव जिल्ह्यातील मोहा, ता. कळंब येथे एका मस्जिदमध्ये धार्मिक शिक्षण देण्याचे कार्य करीत होता. त्याचे लग्न झाले असून, त्याला एक मुलगा आणि मुलगी आहे. मात्र, पती-पत्नीमध्ये मतभेद असल्याने ते विभक्त राहत होते.
हेही वाचा : Illegal immigrants: बेकायदा वास्तव्य असणारे भारतीय अमेरिकेतून हद्दपार; विशेष विमानाने अमृतसरला रवाना
दरम्यान, पुण्यात राहणाऱ्या बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील एका विवाहित महिलेसोबत त्याचे प्रेमसंबंध जुळले. मात्र, या महिलेला तिचे वडील सरदार शेख आणि भाऊ अकबर शेख यांनी या नात्याविरोधात अनेकदा समज दिली. तरीही संबंध सुरूच राहिल्याने मुस्तकिन शेख याला जिवे मारण्याची धमकी सरदार शेख आणि अकबर शेख यांच्याकडून देण्यात आली होती.
हेही वाचा : धक्कादायक! फक्त सीमाच नव्हे तर, तिच्या १३ वर्षीय मुलीवरही होता राहुलचा ‘डोळा’
जेवणाला बोलावून केला घात
२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ८:३० वाजता मुस्तकिन शेखने त्याच्या आईला सांगितले की, तो गोजवाडा येथे सरदार शेख आणि अकबर शेख यांच्या बहिणीच्या घरी मेजवाणीला जात आहे आणि दोन तासांत परत येईल. मात्र, तो घरी परतलाच नाही.
हेही वाचा : धक्कादायक! लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला संपवलं; कारण ऐकून पोलीसही हैराण
रात्री १२:०० वाजण्याच्या सुमारास सरदार शेख, त्याचा मुलगा अकबर शेख, दुसरा मुलगा आणि मेव्हणा या चौघांनी मिळून मुस्तकिन शेख याचा खून केला. त्यानंतर मृतदेह धाराशिव जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महामार्गावर फेकून अपघाताचा बनाव केला.
गुन्हा दाखल
मुस्तकिन शेख यांचे वडील जब्बार शेख यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाशी पोलीस ठाण्यात सरदार शेख, त्याचा मुलगा अकबर शेख, दुसरा मुलगा आणि मेव्हणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश घुले करत आहेत.