सोने- चांदी : जगातील प्रत्येक घडामोडीचा परिणाम हा भारतातील बाजारपेठे वरती होत असतो. भारतात आता सणउत्सव सुरु झाले आहे.याकाळात सोने आणि चांदीचे भाव पुन्हा वाढू शकतात, असे सांगण्यात आले आहे. या महिन्यात भाववाढी कमीहोण्याचेच सत्र सुरु आहे.सप्टेंबर महिना अर्धा झाला तरी सोन्याला मोठी कामगिरी बजावता आली नाही. विक्रमी पातळीवरून सोने चांदीत मोठी घसरण झालेली दिसून येतेय.
यावर्षी ४ मे रोजी सोने ६१,६४६ रुपयांच्या विक्रमी पातळीवर होते, जे मंगळवारी ५९,००७ रुपयांपर्यंत घसरले.दरम्यान, चांदीचा भाव किलोमागे ६,१५२ रुपयांनी घसरला. आयबीजेएनुसार, ५ मे रोजी चांदी ७७,२८० रुपये प्रति किलो या विक्रमी पातळीवर होती. आता तो ७१,१२८ रुपये प्रति किलोवर आला. आयबीजेए देशातील १४ प्रमुख शहरांमध्ये सोने आणि चांदीच्या सरासरी किमती देते. सणासुदीच्या काळात सोन्या-चांदीचे भाव पुन्हा वाढू शकतात.
जळगावातील सुवर्णनगरीतील दर?
जळगाव सुवर्णनगरीत सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ५४,५०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर ५९,५०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका आहे. तर दुसरीकडे चांदीचा दर ७२,००० रुपये प्रति किलो इतका आहे.