तरुण भारत लाईव्ह न्यूज । ४ डिसेंबर २०२२ । फिफा विश्वचषकात व्हिन्सेंट अबूबाकरने स्टोपेज टाईममध्ये नोंदविलेल्या म्हणत्वपूर्ण गोलच्या जोरावर कॅमेरूनने ब्राझीलचा रोमहर्षक पराभव केला. संपूर्ण 90 मिनिटे 0-0 अशी बरोबरी असताना दुखापतीच्या वेळेत (90+2 मिनिटे) गोल करण्यात आला. कॅमेरूनच्या अबुबाकरने हा गोल केला. या गोलच्या जोरावर कॅमेरूनने ब्राझीलवर 1-0 असा विजय मिळवला. मात्र, या मोठ्या विजयानंतरही कॅमेरूनला अंतिम १६ मध्ये स्थान मिळवता आले नाही.