---Advertisement---

Taloda News : बिबट्यांच्या हल्ल्यात दहा वर्षीय बालिका ठार, अखेर दुसरा बिबट्याही जेरबंद

---Advertisement---

( मनोज माळी)
तळोदा :
तालुक्यातील सरदार नगर येथे दि. १७ मार्च रोजी दीपमाला नरसिंग पाडवी या दहा वर्षीय बालिकेवर हल्ला करून ठार करणाऱ्या दुसऱ्या नरभक्षक बिबट्या अखेर आज जेरबंद करण्यात आले, तर पहिला नरभक्षक बिबट्या १९ मार्च रोजी जेरबंद करण्यात आला होता. दरम्यान, परिसरात अजून बिबटे मुक्त संचार करीत असल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे.

तळोदा तालुक्यात बिबट्यांच्या मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण आहे नुकताच सरदार नगर येथे वन विभागाने भिका पाडवी यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात दि. ८ एप्रील रोजी पहाटे बिबट्या जेरबंद झाला यामुळे परिसरात अजून बिबटे मुक्त संचार करीत असल्याने नागरिक शेतकऱ्यांमध्ये व नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

वन विभागाने आतापर्यंत १४ बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले असले तरी अजून बिबट्यांच्या मुक्त संचार होत असल्याने नेमकी किती संख्या आहेत हे अजून समजलेले नाही वन विभाग रात्र दिवस गस्त घालत असून या बिबट्यांच्या बंदोबस्त करण्यात प्रयत्न करित असताना अजून त्यांना पाहिजे तसे यश मिळालेले नाही आत्तापर्यंत बिबट्यांच्या हल्ल्यात आठ जणांच्या मृत्यू व दोन गंभीर जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे तालुक्यात प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

वन विभाग बिबट्या ना जेरबंद करण्यात प्रयत्नशील असून यंत्रना कमी पडत आहे बिबट्यांच्या जेरबंदीसाठी यंत्रणा वाढवावी अशी मागणी परिसरातील शेतकरी नागरिक यांच्या मधून करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment