जळगाव जिल्ह्यातील पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या, प्रभारीराज संपला

 जळगाव : जिल्ह्यातील 17 पोलिस निरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक एम.राजकुमार यांनी बुधवारी रात्री उशिरा काढले आहेत. बदली झालेल्या अधिकार्‍यांनी तातडीने नवीन जागी रूजू व्हावे, असे आदेशात नमूद आहे. 14 अधिकार्‍यांच्या प्रशासकीय कारणास्तव तर तिघांच्या विनंतीवरून बदल्या करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे नियंत्रण कक्षातील नऊ अधिकार्‍यांना प्रभारीपदावर बदली करण्यात आली आहे.

या अधिकार्‍यांच्या झाल्या बदल्या
जळगाव नियंत्रण कक्षातील शिल्पा गोपीचंद पाटील यांच्या रामानंद पोलिस ठाण्यात तर रामानंदचे विजय शिंदे यांना अमळनेरची धुरा मिळाली आहे.जळगाव नियंत्रण कक्षातील संदीप भटू पाटील यांची चाळीसगाव शहर निरीक्षकपदी तर चाळीसगाव शहरचे के.के.पाटील यांची चोपडा शहर पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली. चाळीसगाव ग्रामीणचे संजय ठेंगे यांची नियंत्रण कक्षात तर नियंत्रण कक्षातील बबन मारूती आव्हाड यांना चाळीसगाव ग्रामीणच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली. जळगाव नियंत्रण कक्षातील कावेरी महादेव कमलाकर यांना चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी तसेच यावल पोलिस ठाण्याच्या निरीक्षकपदी राकेश मानगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जळगाव नियंत्रण कक्षातील रंगनाथ धारबळे यांना जि.वि.शा. जळगाव शाखेत तर नियंत्रण कक्षातील उध्दव डमाळे यांची धरणगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. भडगाव पोलिस ठाण्याचे अशोक उतेकर यांची जळगाव सायबर पोलिस ठाण्यात तर नियंत्रण कक्षातील राजेंद्र प्रल्हाद पाटील यांना भडगाव पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे. एमआयडीसी प्रभारी निरीक्षक जयपाल हिरे यांना एमआयडीसी पोलिस ठाण्यात नियुक्ती मिळाली आहे तर एरंडोलचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांची जिल्हापेठला नियुक्ती करण्यात आली असून जळगाव नियंत्रण कक्षातील सतीश गोराडे यांची एरंडोल प्रभारी नियुक्ती करण्यात आली आहे. मुक्ताईनगरचे निरीक्षक शंकर शेळके यांची जळगाव शनिपेठ स्थानकात तर धरणगावचे राहुल खताळ यांची पाचोरा पोलिस ठाण्यात नियुक्ती करण्यात आली आहे.