Tax Savings Scheme : आर्थिक वर्ष 2023-24 शेवटच्या टप्प्यात जात आहे. जर तुम्हीही कर बचतीसाठी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल आणि वेगवेगळ्या कर बचत योजनांचा पर्याय शोधत असाल हि माहिती तुमच्यासाठीच आहे.
या योजनांमध्ये करू शकता गुंतवणूक
1. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC) मध्ये गुंतवणूक करा –
नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट ही एक लहान बचत योजना आहे जी सरकारद्वारे समर्थित आहे. तुम्ही या योजनेत 1000 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेत गुंतवणुकीसाठी कोणतीही मर्यादा नाही. तुम्ही 100 रुपयांच्या पटीत कोणतीही रक्कम गुंतवू शकता. NSC मध्ये गुंतवणूक करून, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट मिळू शकते. सध्या, सरकार या योजनेवर 5 वर्षांच्या कालावधीसाठी 7.70 टक्के व्याजदर देत आहे.
2. ELSS
जर तुम्हाला म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून कर सवलतीचा लाभ मिळवायचा असेल तर तुम्ही इक्विटी लिंक्ड सेव्हिंग्ज स्कीममध्ये गुंतवणूक करू शकता. या योजनेची खास गोष्ट म्हणजे तुम्ही फक्त तीन वर्षांच्या लॉक-इन कालावधीतही कर सवलतीचा लाभ घेऊ शकता. ELSS मध्ये देखील गुंतवणूक करून, तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट मिळू शकते.
3. पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना
बँक एफडी प्रमाणे पोस्ट ऑफिस देखील आपल्या ग्राहकांना मुदत ठेव योजनेची सुविधा प्रदान करते. तुम्ही या योजनेत ५ वर्षांच्या कालावधीसाठी गुंतवणूक करून कर सूट मिळवू शकता. या योजनेंतर्गत, प्राप्तिकराच्या कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांची सूट उपलब्ध आहे. जर तुम्ही पाच वर्षांसाठी मुदत ठेव योजनेत गुंतवणूक केली तर तुम्हाला 7.50 टक्के व्याजदराचा लाभ मिळेल.
4. गृहकर्जाच्या मूळ रकमेवर कर सवलतीचा लाभ उपलब्ध
जर तुम्ही गृहकर्ज घेतले असेल, तर तुम्ही कर्जाच्या मूळ रकमेच्या भरणावर आयकर कलम 80C अंतर्गत 1.50 लाख रुपयांच्या सूटचा दावा करू शकता.