नवीन वर्षात कोणत्या गोष्टीत होणार बदल?

तरुण भारत लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२। आज वर्षाचा शेवटचा दिवस, अनेकजण सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तयार झाले आहेत. काही लोक आपल्या परिवारासोबत तर काही लोक आपल्या मित्रमंडळींसोबत येणाऱ्या वर्षाच स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. नवीन वर्षात सगळेच संकल्प करत असतात. पण तुम्हाला माहित आहे का? प्रत्येक वर्षाच्या सुरवातीला काही ना काही बदल होत असतात. यावर्षी सुद्धा काही महत्वाचे बदल होणार आहेत. तरुण भारताच्या माध्यमातून कोणत्या गोष्टींमध्ये काय बदल होणार आहे ते जाणून घेऊया.

येणाऱ्या नवीन वर्षात म्हणजे २०२३ मध्ये. गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये बदल होऊ शकतात. तेल कंपन्यांकडून गँस सिलिंडरच्या दरात कपात केली जाऊ शकते. नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सरकारकडून एलपीजीबाबत एक चांगली बातमी जाहीर केली जाऊ शकते. तसेच नव्या वर्षाच्या सुरूवातीलाच क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये बदल होणार आहे.

ग्राहकांना ३१ डिसेंबर २०२२ पूर्वी त्यांच्या क्रेडिट कार्डमध्ये उर्वरित सर्व रिवॉर्ड पॉइंट्स भरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासोबतच २०२३ मध्ये नवीन वाहनांच्या किंमतीत वाढ होणार आहे. एमजी मोटर, मारुति सुजुकी, ह्युंडई मोटर्स, होंडा, टाटा मोटर्स, रेनॉल्ट, ऑडी आणि मर्सिडीज-बेंच या प्रमुख ऑटोमोबाईल कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे.

नवीन वर्षात रिझर्व्ह बँक ने सुद्धा काही महत्वाचे नियम लागू केले आहेत. रिझर्व्ह बँकेने जारी केलेले नवीन लॉकर नियम 1 जानेवारी 2023 पासून लागू होतील. नियम लागू झाल्यानंतर बँकांना लॉकरबाबत ग्राहकांशी मनमानी करता येणार नाही. लॉकरमध्ये ठेवलेल्या वस्तूचे खूप नुकसान झाले. तर त्याची जबाबदारी आता बँकेची असणार आहे. याशिवाय आता ग्राहकांना 31 डिसेंबरपर्यंत बँकेसोबत करार करावा लागेल. याद्वारे ग्राहकांना लॉकरच्या नियमांमध्ये झालेल्या बदलाची माहिती एसएमएस आणि इतर माध्यमातून बँकेला द्यावी लागेल. त्यासोबतच पॅन कार्ड संदर्भात एक महत्वाचा निर्णय घेतला गेला आहे, तो म्हणजे नवीन वर्षात तुम्हाला तुमचे आधारकार्ड पॅनकार्डसोबत जोडणे बंधनकारक आहे. ज्या लोकांनी हे काम केलं नाही, त्यांचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते. लवकरात लवकर तुम्ही तुमचं आदर कार्ड पॅन कार्ड जोडून घ्या, म्हणजे तुमचं पॅन कार्ड रद्द केलं जाणार नाही.