---Advertisement---

VIRAL VIDEO : साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला आग: सुदैवाने जीवितहानी टळली

by team
---Advertisement---

अहमदाबादमधील साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनच्या बांधकामस्थळी शनिवारी सकाळी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. ही घटना सकाळी साडेसहा वाजता घडली असून, अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि दोन तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

घटनेचा आढावा

सकाळी सहा वाजता साबरमती बुलेट ट्रेन स्टेशनला अचानक आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या १ २  गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. सोशल मीडियावर या आगीचे व्हिडिओ वेगाने व्हायरल झाले असून, त्यामध्ये स्टेशनच्या एका भागाला आग लागल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

 

आगीचे कारण

शनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडकडून मिळालेल्या माहितीनुसार, बांधकाम सुरू असलेल्या स्टेशनच्या छताच्या शटरिंगला आग लागली. प्राथमिक तपासानुसार, वेल्डिंग दरम्यान निर्माण झालेल्या स्पार्कमुळे आग लागली असावी असा अंदाज आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि पुढील चौकशी सुरू आहे.

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या अंतर्गत या स्टेशनचे बांधकाम सुरू आहे. हा प्रकल्प एकूण ५०८ किमी लांबीचा असून, महाराष्ट्रातील मुंबईपासून गुजरातमधील अहमदाबादपर्यंत विस्तारित आहे. या मार्गावर एकूण १२ बुलेट ट्रेन स्टेशन्स प्रस्तावित आहेत, त्यामध्ये मुंबई, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सूरत, भरूच, वडोदरा, आनंद, नडियाद, अहमदाबाद आणि साबरमती यांचा समावेश आ

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment