तरुण भारत लाईव्ह न्यूज । १२ डिसेंबर २०२२ । एरंडोल येथील तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात २ लाख ८८ हजाराचे नुकसान झाले. नगरपालिकेच्या अग्निशमन पथकाने जवळपास ३० मिनिटात आगीवर नियंत्रण केले. आगीचे कारण समजू शकले नाही. विशेष हे की शनिवार रविवारची सुट्टी असल्यामुळे कृषी कार्यालय बंद होते.
दरम्यान, बंद कार्यालयाला अचानक आग लागल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याबाबत कृषी सहाय्यक चंद्रकांत सैंदाणे यांनी एरंडोल पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. सुनील लोहार राजेश पाटील मिलिंद कुमावत हे पुढील तपास करीत आहेत.
२ लाख ८८ हजाराचे नुकसान
लाकडी, टेबल, कपाट, खुर्च्या, लॅपटॉप, प्रिंटर मॉनिटर यांच्यासह शासकीय कार्यालयातील अभिलेख आदी कार्यालयाचे साहित्य जोडून खाक झाले असून एकूण २ लाख ८८ हजाराचे नुकसान झाले आहे.