गुजरातमधील बनासकांठा येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथील एका फटाक्याच्या कारखान्यात मोठा स्फोट झाला आहे. फटाक्याच्या कारखान्यात आणि गोदामात झालेल्या स्फोटामुळे कारखान्यात काम करणाऱ्या १२ कामगारांचा मृत्यू झाला आहे.
डीसा औद्योगिक क्षेत्रात मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे. फटाक्याच्या कारखान्यात लागलेल्या आगीमुळे मोठा स्फोट झाला आहे. यानंतर अनेक स्फोट झाले, स्फोट इतका जोरदार होता की कारखान्याचा स्लॅब कोसळला.
अग्निशमन दलाने घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळवले. अग्निशमन दलाकडून ढिगाऱ्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहे. जखमी कामगारांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.पोलिसांनी आतापर्यंत यामध्ये सात जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे.अशी माहिती बनासकांठाचे जिल्हाधिकारी मिहिर पटेल यांनी दिली आहे .