पुण्यातील वडजाई परिसरात गोळीबार, सुदैवाने…

पुणे । पुण्यातून पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज पहाटे अज्ञात व्यक्तीने निलेश सुभाष सातव यांच्या घरातील खिडकीतून गोळीबार केला.

सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस अधिकारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.

निलेश सुभाष सातव ( ३५ रा. वडजाई वस्ती,) यांच्या घरातील खिडकीतून अज्ञात व्यक्तीने गोळीबार केला. सुदैवाने यामध्ये कोणालाही गोळी लागली नाही.

घटनेची माहिती कळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटना स्थळी दाखल झाले. त्यांनी तात्काळ हल्ले खोरांचा शोध सुरू केला आहे.

मागील काही दिवसांपूर्वी मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका मित्राला पुनर्वसन केंद्रात नेण्यास नकार दिल्याने, एक तरुण आपल्या परवानाधारक पिस्तुलातून गोळीबार करायला गेला होता.

त्या घटनेतही कोणी जखमी झाले नव्हते. या नवीन गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे, परंतु पोलिसांकडून तपास सुरू आहे.