काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यावर गोळीबार

नांदेड : नांदेडमध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सविता गायकवाड यांच्यावर गोळीबार करण्यात आला असून त्या जखमी झाल्या आहेत. नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावर रात्री ही घटना घडली.

सुत्रांनुसार, नांदेड शहरातील बाफना उड्डाणपुलावरून सविता गायकवाड या रात्री आपल्या स्कूटीवरुन मगनपुरा येथून घरी जात होत्या. दरम्यान, एका दुचाकीवरुन आलेल्या तीन अज्ञातानी त्यांच्यावर गोळीबार केला. यात सविता गायकवाड यांच्या डावा दंडाला गोळी लागली. त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सविता गायकवाड यांच्‍यावर गोळीबार केल्‍यानंतर ते दुचाकीस्‍वार पसार झाले आहेत. यामुळे गोळीबार करणारे आरोपी कोण होते. त्यांनी हल्ला का केला? याचा तपास सुरू आहे.