Muktainagar-Bodwad Constituency : मुक्ताईनगर-बोदवड मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार असलेले विनोद सोनवणे यांचा बोदवड तालुक्यात प्रचार सुरु असतांना त्यांच्यावर कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची घटना घडली आहे. दरम्यान या घटनेमुळे तालुक्यात एकाच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर- बोदवड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत अपक्ष म्हणून विनोद सोनवणे हे निवडणूकीच्या रिंगणात उतरले आहे. दरम्यान, मंगळवार ५ नोव्हेंबर रोजी सकाळी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील जागृती मारोती मंदीरात जावून प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराला सुरूवात केली.
त्यानंतर बोदवड तालुक्यातील राजूर गावात विनोद सोनवणे यांची प्रचार रॅली सुरू असतांना कारमधून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेमुळे बोदवड तालुक्यातील एकच खळबळ उडाली आहे. या गोळीबारमध्ये कुणालाही दुखापत झालेले नाही. प्रसार माध्यमांनी विनोद सोनवणे यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.