राज्यातील जीबीएस आजाराचा पहिला बळी, पुण्यातील सीएचा उपचार दरम्यान निधन

पुणे:  जिल्ह्यात गुलेन बॅरी सिंड्रोम (GBS) रुग्णांच्या संख्येत शनिवारी (ता. 24) वाढ झाली नसली तरी 14 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे शहरात गॅलन बॅरी सिंड्रोमने बुधवारी पुण्यात जुलाबाच्या त्रासामुळे एका रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला रुग्ण पुण्यातील डीसके परिसरात राहणारा सीए (चार्टर्ड अकाउंटंट) होता, आणि त्याला 11 जानेवारी रोजी पुण्यात जुलाबाचा त्रास सुरू झाला होता.

त्यानंतर तो काही कार्यक्रमानिमित्त त्याच्या मूळ गावी सोलापूर येथे गेला आणि तिथे त्याच्या स्थितीत वाढ झाली, अशक्तपणा जास्त प्रमाणात जाणवला. त्याला सोलापूरमधील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी GBS (गुलेन बॅरी सिंड्रोम) हा आजार असल्याचे निदान केले. उपचार सुरू असताना त्यांची स्थिती स्थिर होती, पण त्यांच्या शरीराच्या अंगांमध्ये कोणतीही हालचाल होऊ शकत नव्हती.

काही दिवसांच्या उपचारानंतर शनिवारी त्यांना अतिदक्षता विभागातून बाहेर हलवण्यात आले, मात्र काही वेळातच त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आणि त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरांनी मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही, म्हणून शवविच्छेदन करण्यात आले आहे.

पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचे रुग्ण संख्या 73 वर पोहोचली आहे, त्यामध्ये काही रुग्णांची स्थिती गंभीर आहे. पुणे महानगर पालिका या आजारावर उपाययोजना करत आहे.

जीबीएसची लक्षणे 

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना सामान्यत: अशक्तपणा आणि हातपायांना मुंग्या येण्याची समस्या असते. या आजाराचे नेमके कारण अद्याप पूर्णपणे समजलेले नाही, परंतु याला ऑटोइम्यून डिसऑर्डर म्हटले जाते. गॅलन बॅरी सिंड्रोम प्रामुख्याने लसीकरण किंवा शस्त्रक्रियेनंतर 7 दिवस ते 5 आठवड्यांच्या कालावधीत रुग्णांमध्ये दिसून आले आहे.