धुळे : शिंदखेडा तालुक्यातील होळ गावात पिकअप व्हॅन आणि ईसीओ वाहनाची भीषण धडक झाली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे
शिंदखेडा तालुक्यातील वारूड येथे कीर्तनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम आटोपून (एम. एच. 18 बी. एक्स. 0539) या क्रमांकाच्या ईको गाडीने भाविक घरी परत निघाले होते. ही गाडी शिंदखेडा तालुक्यातील होळ जावळील दसवेल फाट्याजवळ आली. यावेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनाने (एम. एच. 04 इ. वाय. 6021) क्रमांकाच्या भाविकांच्या वाहनाला समोरून जोरदार टक्कर मारली.
यांचा मृत्यू झाला
या भीषण अपघातात इको वाहनामध्ये बसलेले सुनील दंगल कोळी (कुवर) (वय 30, रा. परसामळ, ता.शिंदखेडा), मंगलाबाई लोटन देसले (वय 59, रा. गांधी चौक, शिंदखेडा), विशाखा आप्पा माळी (महाजन) (वय १३ ,रा. धानोरा,ता. शिंदखेडा, मयुरी पितांबर खैरनार( परदेशी) (वय 28, रा. विजयनगर ,शिंदखेडा), जयेश गुलाब बोरसे, (वय 22, रा. वारूड , तालुका शिंदखेडा) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. या अपघातात दोन्ही वाहनांमधील 6 जण जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच नरडाणा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे हे लागलीच घटनास्थळी दाखल झालेत. अपघात भीषण झाल्याने मोठा आवाजामुळे गावातील स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यासाठी सहकार्य केले. नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस देखील घटनास्थळी पोहोचल्याने उर्वरित जखमींना रुग्णालयात वेळीच दाखल करणे शक्य झाले आहे. या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात प्रथमदर्शी अपघाताची नोंद करण्यात आलेली आहे.