भीषण अपघात : आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

अमरावतीचे शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या भावाच्या कारला भीषण अपघात झाल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी पातूर शहराजवळ (अकोला ) घडली. या अपघातात आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. जखमींना अकोल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी गावकऱ्यांनी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर मदतकार्य सुरु झाले. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.