जामनेर नगरपालिका निवडणूक, मतदार याद्यांवर तब्बल इतक्या हजार हरकतींचा पाऊस

---Advertisement---

 

जामनेर (प्रतिनिधी) : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले. त्यानंतर जिल्हा परिषद आणि नगरपालिका प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले आहे. यासह मतदार याद्यादेखील प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहे. अशातच जामनेर नगरपालिका निवडणूकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदार याद्यांवर तब्बल पाच हजार हरकती दाखल करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणावर हरकती दाखल झाल्यामुळे कर्मचाऱ्यांना कसरत करावी लागत आहे.

जामनेर नगरपालिकेच्या प्रभाग आरक्षणाची सोडत दिनांक ८ ऑक्टोबर रोजी काढण्यात आली होती. त्याचबरोबर मतदार याद्या प्रसिद्ध झाल्या आणि त्यावर मतदारांनी हरकती घ्याव्यात यासाठी मुदत देण्यात आली होती. दरम्यान पहिल्या काही दिवसातच तब्बल दोन हजार दोनशे हरकती दाखल झाल्या होत्या.

हरकती घेण्यासाठी १३ ऑक्टोबर पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र नागरिकांच्या सोयीसाठी ही मुदत १७ ऑक्टोबर पर्यंत वाढवण्यात आली होती. काल दिनांक १७ ऑक्टोबर रोजी शेवटच्या दिवशी नगरपालिकेत हरकतींचा पाऊस पडला शेवटच्या दिवशी पाच हजार मतदारांनी हरकती नोंदवल्या आहे त्यात प्रभाग क्रमांक ३, ४ ,६ ,७, ८, ९ या प्रभागातील मतदारांनी मतदार याद्यांवर हरकती घेतलेल्या आहे.

नगरपालिकेत मतदार यादीवर आलेल्या पाच हजार हरकतींची नोंदणी छाननी प्रत्यक्ष प्रभागात जागेवर जाऊन तपासणी ही सर्व कार्यालयीन कामे पालिका कर्मचारी करीत असून चुकीचे आलेल्या अर्जांची पडताळणी करताना कर्मचाऱ्यांची दमछाक होणार असून अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या अधि प्रमाणित करून ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध होणार आहेत. तसेच मतदान केंद्रनिहाय मतदार याद्या ७ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. असे प्रशासनाने सांगितले आहे.

मतदार यादीवर आलेल्या हरकतींची नोंदणी व छाननी प्रत्यक्ष जागेवर जाऊन प्रभागात तपासणी हे सर्व कार्यालयीन कामे पालिकेचे कर्मचारी करत असून यासाठी चार पथकांची नियुक्ती करण्यात आली असून प्रभाग निहाय आलेल्या हरकतींची पडताळणी करून मतदारांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करणार असल्याचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांनी यावेळी सांगितले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---