धरणगाव : भारताला एक मजबूत राष्ट्र बनवण्याच्या उद्देशाने, ६ एप्रिल १९८० रोजी नवी दिल्लीतील कोटला मैदानावर झालेल्या कामगार अधिवेशनात भाजपची स्थापना करण्यात आली, ज्याचे पहिले अध्यक्ष म्हणून श्री अटलबिहारी वाजपेयी यांची निवड करण्यात आली होती. स्थापनेसह, भाजपने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर आवाज उठवून भारतीय लोकशाहीमध्ये आपला मजबूत सहभाग नोंदवला आणि भारतीय राजकारणाला नवीन आयाम दिले.
आज धरणगाव येथे भाजपा कार्यालयात स्थापना दिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. सकाळी दहा वाजता शहर व परिसरातील भाजपाचे जेष्ठ कार्यकर्ते सहीत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रारंभी भगवान प्रभु श्रीराम व पक्षाचे दिवंगत नेते शामाप्रसाद मुखर्जी यांचा प्रतिमेचे सह भाजपाचे राष्ट्रीय ध्वज चे पुजन करण्यात आले.
त्या प्रसंगी भाजपाचे जेष्ठ नेते डि.जी.पाटील,पी.सी.पाटील,जिल्हाउपाध्यक्ष संजय महाजन,कमलेश तिवारी,शिरीष बयस,पुनीलाल महाजन,कैलास माळी,तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील,शहराध्यक्ष दिलीप महाजन,सरचिटणीस कन्हैया रायपुरकर, जेष्ठ पत्रकार कडू महाजन,पांडुरंग मराठे,मधुकर महाजन,भास्कर मराठे, दिनेश पाटील भोणे,ललीत येवले,गोपाल पाटील,भालचंद्र महाजन,सुनिल चौधरी,राजु महाजन,राजेंद्र बागड,गजानन ठाकुर,आनंद बाजपाई,धनराज सोनवणे,भैय्या मराठे,युवा मोर्चाचे विशाल महाजन,निर्दोष पाटील सोनवद ,मच्छिंद्र पाटील बांभोरी,आनंदा धनगर, डोंगर चौधरी,अनिल महाजन,आदि कार्यकर्ते उपस्थित होते
Dharangaon News : ‘भाजपा स्थापना’ दिनानिमित्त धरणगावात ध्वज व प्रतिमा पूजन
