---Advertisement---

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळा

by team
---Advertisement---

जळगाव :  भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या 78 व्या वर्धापन दिनानिमित्त जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम गुरुवार, 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

या कार्यक्रमास जळगाव शहरातील स्थानिक लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्य सैनिक, शहिद जवानांच्या पत्नी व वीरमाता, वीरपिता यांनी उपस्थित राहावे.

यादिवशी सकाळी 8.35 ते 9.35 वाजता या वेळेत ध्वजारोहणाचा किंवा इतर कोणताही शासकीय अथवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी सकाळी 8.35 वाजेच्या पूर्वी किंवा 9.35 वाजेच्यानंतर आयोजित करावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment